Gautam Adani ( Marathi News ) : हिंडेनबर्ग अहवालाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी या अहवालावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले आहेत. "‘संशोधन अहवाल’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या तथाकथित अहवालात तेच ते जुने आरोप होते. चावून चोथा झालेले तेच जुने आरोप होते, जे माझे विरोधक त्यांच्या माध्यमातील सहकाऱ्यांना हाताशी धरून त्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत होते. एकंदरीत आम्ही स्वतःच जाहीर केलेल्या आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीमधून, निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला होता," असा हल्लाबोल अदानी यांनी केला आहे.
"आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप काही नवीन नव्हते. म्हणून सर्वसमावेशक प्रतिसाद जारी केल्यानंतर मी याबद्दल अधिक विचार केला नाही. असं म्हणतात ज्यावेळी सत्य आपल्या बुटाच्या लेसेस बांधून बाहेर पडायच्या तयारीत असते त्यावेळी, असत्य मात्र जग पालथे घालून मोकळे झालेले असते. माझ्यासारख्या सत्याच्या ताकदीवर गाढ विश्वास असणाऱ्याला हा असत्याच्या शक्तीचा हा एक धडा होता," असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.
"एक मूलभूत कमकुवत दुवा उघड केला"
गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग अहवालावर भाष्य करताना एक कमतरताही मान्य केली आहे. ते म्हणाले की, "या संकटाने आमच्या समूहातील एक मूलभूत कमकुवत दुवा उघड केला, ज्याच्याकडे मी दुर्लक्ष केले होते आणि तो म्हणजे, आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहचण्याचा यंत्रणेकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते. अदाणी समूहाने काय केले किंवा करत आहे त्याचा आकार, प्रमाण आणि दर्जा याची माहिती पायाभूत सुविधा उद्दोगाना अर्थ साहाय्य पुरवणारी वर्गाच्या बाहेरील मोजक्या लोकांना माहीत होता. आम्हाला असे उगाचच वाटत होते की सर्व गैर-आर्थिक भागधारक देखील आमच्याबद्दलचे सत्य जाणून आहेत - त्यांना हे माहिती आहे कीजे आमची आर्थिक स्थिती मजबूत आहे, आमचा प्रशासकीय प्रणाली निर्दोष आहे, आमचा विकासाचा रोडमॅप योग्य आहे आणि भारतातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो, यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता. या अनुभवाने आमच्या गैर-आर्थिक भागधारकांशी प्रभावीपणे सोबत घेण्याची गरज अधोरेखित केली. आम्ही आमच्या कर्जाच्या कथित धोकादायक पातळीच्या कथांचा आणि निराधार राजकीय आरोपांचा प्रतिकार करण्यात अयशस्वी झालो, परिणामी गैरसमज जास्त पसरला," असं ते म्हणाले.