एस. के. गुप्ता नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांवर १५ जानेवारीपासून हॉलमार्किंग संपूर्ण देशात लागू होत आहे. यामुळे सोन्याच्या दागिन्यांत इतर धातू ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मिसळवता येणार नाही.
केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, दागिने निर्मात्यांना रजिस्ट्रेशनसाठी एक वर्षाची वेळ दिला आहे. यामुळे देशात दागिने बनवणाऱ्यांना ओळखता येईल. देशात फक्त १४,१८ व २२ कॅरेटचेच शिल्पाकृती आणि दागिने मिळतील. कोणीही ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त अन्य धातू त्यात मिसळला तर त्याला एक वर्षाचा तुरूंगवास व किमान एक लाख रूपयांचा दंड होईल. जास्तीतजास्त दंडाची रक्कम दागिन्याच्या किमतीच्या पाचपटीपेक्षाही जास्त असू शकते.
पासवान म्हणाले की, दागिने बनवणारे आता २२ कॅरेटचा शिक्का मारून सोन्याचे दागिने विकत आहेत. तपासात अनेकदा हे दिसले आहे की, जेवढ्या कॅरेटचा शिक्का आहे त्यापेक्षा खूप कमी कॅरेटचा तो दागिना होता. हॉलमार्किंगच्या चार चिन्हांमुळे अशी फसवणूक होणार नाही. ते म्हणाले की, देशात डिसेंबर २०१९ पर्यंत २३४ जिल्ह्यांत ८९२ एसेर्इंग किंवा हॉलमार्किंग सेंटर बनवले आहेत. तेथे दागिने निर्माते त्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करू शकतील. एका दागिन्यावर हॉलमार्किंग करण्याचा खर्च ३५ रूपये येईल. ग्राहकदेखील या एसेर्इंग केंद्रावर जाऊन आपल्या दागिन्यांच्या कॅरेटची खात्री करून घेऊ शकतात.प्रत्येक दागिने निर्मात्याची असेल स्वतंत्र ओळखरामविलास पासवान म्हणाले की, देशात जवळपास २८ हजार दागिने निर्माते असले तरी अंदाज असा आहे की प्रत्यक्षात ते तीन ते चार लाख संख्येत आहेत. या सगळ््यांंची नोंद झाल्यानंतर त्यांना एक ओळखीचे चिन्ह दिले जाईल. जेव्हा व्यापारी त्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करायला जाईल तेव्हा त्याला त्याच्या दागिन्यांवर त्याचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) चिन्हही असेल. काही फसवणूक झाल्यास दागिने निर्माता सहजपणे पकडला जाईल.हॉलमार्किंगमुळे भेसळ बंददागिन्यांचे हॉलमार्किंग झाल्यावर ग्राहकांना योग्य त्या कॅरेटचे शुद्ध सोनेच मिळेल. जर कोणत्या दागिने बनवणाºयाने कमी कॅरेटचे दागिने बनवून २२ कॅरेटचा शिक्का मारल्यास हॉलमार्किंग सेंटरवर गेल्यास तपासात ती लबाडी उघड होईल व दागिन्यांवर १८ कॅरेटचाच शिक्का मारला जाईल किंवा दागिने वितळवून ते पुन्हा बनवून आणण्यास सांगितले जाईल. ग्राहक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भारत सोन्याची सर्वात जास्त आयात करणारा देश आहे. दागिने उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी ७०० ते ८०० टन सोन्याची आयात केली जाते. सध्या देशात ४० टक्के दागिन्यांवरच हॉलमार्किंग केली जाते. नव्या हॉलमार्किंग नियमांमुळे देशातील दूर अंतरावरील भागांत दागिन्यांच्या हॉलमार्किंगला अनिवार्य करण्यासाठी एक वर्षाचा वेळ दिला जाईल.दागिन्यांवर असा असेल शिक्काबीआयएसच्या एका अधिकाºयाने सांगितले की, २२ कॅरेट अर्थात एक ग्राम सोन्यात ९१६ मिलीग्राम शुद्धता, १८ कॅरेट म्हणजे ७५० मिलीग्राम शुद्धता आणि १४ कॅरेटमध्ये एक हजार मिलीग्राम सोन्यात ५८५ मिलीग्राम शुद्धता असणे अपेक्षित आहे. दागिना जेवढ्या कॅरेट सोन्याचा असेल त्यावर तेवढ्या आकड्यासह इंग्रजी के अक्षराचा शिक्का असेल. म्हणजे २२ कॅरेटसाठी २२ के ९१६ ची सील, बीआयएसचे चिन्ह आणि हॉलमार्किंग सेंटरचे चिन्ह लागेल. सराफाची ओळख पटवणाराही शिक्का असेल.