Join us

घसरणीला लगाम; सेन्सेक्स सावरला

By admin | Published: September 23, 2015 10:12 PM

युरोपीय बाजारातील मजबुती आणि व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने शेअर बाजारातील घसरण बुधवारी थांबली. सेन्सेक्स १७१.१५ अंकांनी वधारून शेअर बाजार २५,८२२.९९ वर बंद झाला.

मुंबई : युरोपीय बाजारातील मजबुती आणि व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने शेअर बाजारातील घसरण बुधवारी थांबली. सेन्सेक्स १७१.१५ अंकांनी वधारून शेअर बाजार २५,८२२.९९ वर बंद झाला.गेल्या २ सत्रात सेन्सेक्स ५६७.०७ अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. तथापि बुधवारी त्यात सुधारणा झाली. आजही प्रारंभी चीनमधील घडामोडींचा परिणाम होऊन बाजारात नरमी होती; पण युरोपियन मार्केट सुरू होताच त्यात सुधारणा होण्यास प्रारंभ झाला.पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार आहे. त्यात व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने व्याजदराशी संबंधित शेअर्स वधारले. त्यानंतरही वृद्धी कायम राहिली.आज सकाळी बीएसई सेन्सेक्स २५,५२६.५३ या अंकावर खुला झाला. त्यात घसरण होऊन तो २५,३७६.४८ वर पोहोचला. चीनमधील घसरत्या उत्पादनाचा हा परिणाम होता. मात्र, युरोपीय मार्केट सुरू होताच बाजार सावरला.सेन्सेक्स २५,९३४.०२ वर पोहोचला. दिवसअखेर तो २५,८२२.९९ वर होऊन स्थिर झाला.मात्र टाटा मोटर्स (१.७३ टक्के), भारती एअरटेल (१.४९ टक्के), भेल (१.२४), गेल (०.८६) आणि बजाज आॅटो (०.७९ टक्के) यांची मोठी घसरण झाली.भारतात ही परिस्थिती असली तरी आशियात चीन, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान येथील बाजारात ०.७९ टक्के, तर २.२६ टक्क्यांनी घसरण झाली; पण युरोपियन बाजाराचा अनुकूल परिणाम भारतात झाला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनमधील शेअर बाजारात तेजी होती.बीएसईच्या प्रमुख ३० शेअर्सपैकी १९ शेअर्समध्ये सुधारणा झाली. त्यात ल्युपिन (२.८३), वेदांता (२.७१), एचडीएफसी बँक (२.७१), आयटीसी (१.७१), आयसीआयसीआय (१.२०), कोल इंडिया (१.२०), इन्फोसिस (१.०१ टक्के) यांचा प्रमुख लाभ झाला.दिवसभरात चढ-उतार५० शेअर्सचा समावेश असलेला एनएसई वधारून एकवेळ ७,८८२.९० वर पोहोचला होता. शेवटी ७,८४५.९५ अंकावर स्थिर झाला. एनएसईमध्ये ३३.९५ अंकांनी वाढ झाली.