Join us  

इस वक्त दिमाग से नही, दिल से सोचना है... कंपनीकडून कामगारांच्या पगारकपातीचा निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 4:16 PM

कंपनीने कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी लॉकडाऊन कालावधीत कामगारांची पगार कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एचआर विभागाने रविवारी सर्वच कामगार

मुंबई - देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत असलेल्या कंपनीतील कामगारांच्या पगारात १० टक्के कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. मात्र, रविवारी कंपनीने कर्मचाऱ्यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. कंपनीच्या या निर्णयामुळे कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हमारा बजाज... हे कंपनीने घोषवाक्य कामगारांसाठी खरे ठरले आहे. ही वेळ, दिमाग से नही, बल्की दिल से सोचन की है... असेही कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

कंपनीने कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी लॉकडाऊन कालावधीत कामगारांची पगार कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एचआर विभागाने रविवारी सर्वच कामगार, कर्मचाऱ्यांना पत्रव्यवहार करुन याबाबत माहिती दिली. आपल्या कंपनीच्या यशात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या टोकातील कामगारांचाही वाटा आहे. त्यामुळे, या कालावधीत प्रत्येक कामगारांच्या कुटुबीयांची काळजी करणे हे कंपनीचं कर्तव्य आहे. एकाही कॉन्ट्रॅक्ट कामगाराच्या कुटुंबात कुणीही उपाशीपोटी झोपता कामा नये, असेही कंपनीने म्हटले आहे. 

ऑटमोबाईल कंपनींचे उत्पादन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासून बंद आहे. तर, एप्रिल महिन्यात एकही घरगुती विक्री  ऑटोमोबाईल कंपन्यांची झालेली नाही. त्यातच, कामगारांच्या पगारीसारख्या फिक्स खर्चामुळे कंपन्यांच आर्थिक गणित बिघडलं  आहे. मात्र, आपल्यासारख्या दिग्गज आणि नफा कमावणाऱ्या कंपन्यांनी या कालावधीत कामगार, कर्मचाऱ्यांचा विचार करणे गरजेचं आहे. त्यासाठी, प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे कंपनीने १० टक्के पगार कपातीचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे कंपनीने घोषित केले आहे. कंपनीने कॅश रिझर्व्ह वाचविण्यासाठी हा १० टक्के पगार कपातीचा निर्णय घेतला होता. 

दरम्यान, देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला असून ग्रीन झोनमधील कंपन्याना उत्पादनाची परवागनी देण्यात आली आहे. तसेच, सेझ मध्येही कामकाज सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइलकोरोना वायरस बातम्याकामगारपैसा