Join us  

‘हॅण्ड हेल्ड टर्मिनल’ सुविधा; आता रेल्वेत मिळणार हक्काची जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 6:48 AM

कोरोना कमी झाल्यानंतर सगळे रुळावर येऊ लागले आहे असेच रेल्वे ही आता पुन्हा जोमाने सुरू झाली असून वेळापत्रकही रुळावर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दूर पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आधी केले जाते. आरक्षित सीट कन्फर्म झाल्यानंतर उर्वरित उपलब्ध राहिलेल्या सीट कोणाला द्यायची यावर टीसीची मक्तेदारी चालायची. या मक्तेदारीला आळा बसविण्यासाठी आता ‘हॅण्ड हेल्ड टर्मिनल’ ही प्रणाली अस्तिवात आणली आहे. त्यामुळे टीसीची मक्तेदारी संपून प्रवाशांना आपली हक्काची जागा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक विभागाला ‘एचएचटी’ मशीन देण्यात आले आहेत.

कोरोना कमी झाल्यानंतर सगळे रुळावर येऊ लागले आहे असेच रेल्वे ही आता पुन्हा जोमाने सुरू झाली असून वेळापत्रकही रुळावर आले आहे. त्यामुळे गावी, परराज्यांत जाणाऱ्यांची रेल्वे बुकिंग सुरू झाली आहे. रेल्वेत आरक्षित सीट मिळावी यासाठी महिना दोन महिने आधीच तिकीट काढले जाते. मात्र, अनेकांची प्रवाशाची तिकीट काढूनही आरक्षित सीट मिळत नसे त्यामुळे टीसीची मनधरणी करावी लागत होती. टीसीही मग आपल्या मर्जीने सीट देत होता. मात्र, आता प्रवसातच प्रवाशाचे तिकीट कन्फर्म होणार असल्याने टीसीची मनमानी मोडीत निघणार आहे.

काय आहे एचएचटी उपकरण? एचएचटी उपकरण हे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. आपण तिकीट काढले असल्याने आपल्या हक्काची सीट त्यामुळे मिळणार आहे. एचएचटी उपकरणात किती अनरक्षित सीट आहेत याची माहिती होणार आहे. 

टीसीच्या मनमानीला चाप रेल्वे प्रवासाचे जाणार तिथंपर्यंतच्या तिकिटाचे पूर्ण पैसे भरले असतानाही काहीवेळा आरक्षित सीट मिळत नाही. त्यामुळे प्रवासात टीसीला पैसे देऊन सीटची सोय करून घेतली जाते. त्यामुळे टीसीची मनमर्जी सुरू होती. या मनमर्जीला चाप बसणार आहे.

जागा मिळणे झाले सोपेबाहेरगावी रेल्वे प्रवास करताना आधीच आरक्षित सीटची बुकिंग केली जाते. मात्र, काहीवेळा आपले सीट आरक्षण वेटिंगवर असते. मात्र, आता टीसीला पैसे न देता आपली सीट आरक्षित होणार आहे. त्यामुळे हक्काची जागा मिळणे सोपे झाले आहे.

या गाड्यांमध्ये झाला वापर सुरू     कोकण रेल्वेमार्ग जात आहे. या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये एचएचटी उपकरण टीसीना देण्यात आले आहे.     मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरोतो, एर्नाकुलम यात सुविधा आहे.

कोरोना कमी झाल्यानंतर पुन्हा रेल्वे वेळापत्रक रूळावर आले आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये अनेक सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. त्यात आता धावत्या रेल्वेत आपले तिकीट कन्फर्म होणार आहे. यासाठी प्रत्येक विभागात एचएचटी मशीन तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोकण रेल्वे विभागात असे उपकरण उपलब्ध नाही आहे. - के. एस. कुशवाह, स्टेशन अधिकारी

टॅग्स :रायगडमुंबईरेल्वे