Join us  

हस्तकला निर्यातीत आठ टक्के वाढ'

By admin | Published: August 12, 2016 3:45 AM

भारताच्या हस्तकला क्षेत्रातील निर्यात गेल्या आर्थिक वर्षात ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ३१ हजार कोटी रुपयांना स्पर्श करीत आहे

नवी दिल्ली : भारताच्या हस्तकला क्षेत्रातील निर्यात गेल्या आर्थिक वर्षात ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ३१ हजार कोटी रुपयांना स्पर्श करीत आहे, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. इराणी यांनी सांगितले की, हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रस्ताव मंत्रालयासमोर आहे. यात काही उणिवा होत्या. त्या दूर करण्यासाठी हा प्रस्ताव निर्यात प्रोत्साहन परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ तसेच हातमाग आणि हस्तकला निर्यात महामंडळ डिजिटल मार्केटिंगमध्ये शिरले आहे. राज्यांतील अनेक महामंडळेही याचा वापर करीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)