नवी दिल्ली : स्टार्टअप कंपन्यांची प्राप्तिकराशी संबंधित प्रकरणे हाताळताना सर्वोच्च काळजी घ्या, अशा सूचना केंद्रीय थेट कर बोर्डाने (सीबीडीटी) प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सीबीडीने एक परिपत्रक जारी केले आहे. स्टार्टअप कंपन्यांच्या प्राप्तिकर तक्रारींबाबत तीन दिवसांत अंतिम कृती अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राप्तिकर अधिकाºयांना त्यात दिल्या आहेत. परिपत्रकात म्हटले आहे की, स्टार्टअप कंपन्यांशी संबंधित प्रकरणे अत्यंत काळजीपूर्वक हाताळायला हवीत, असे तुम्हाला कळविण्यात येत आहे. आपल्या अंतर्गत काम करणाºया सर्व अधिकाºयांनी ही प्रकरणे सर्वोच्च काळजी घेऊन हाताळणे आवश्यक आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की, काही तक्रार असल्यास त्यावरील प्राथमिक कृती अहवाल दुसºयाच दिवशी या कार्यालयाकडे पाठविण्यात यावा. तसेच अंतिम कृती अहवाल तीन कामकाजी दिवसांत पाठविण्यात यावा. स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असून, त्यानुसार सीबीडीटीअंतर्गत केवळ स्टार्टअपला वाहिलेला विशेष विभाग सुरू करण्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली होती. या विशेष विभागात स्टार्टअप कंपन्यांना भेडसावणाºया समस्यांचा निपटारा करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ आॅगस्ट रोजी म्हटले होते की, ‘स्टार्टअपचा प्राप्तिकराशी संबंधित कोणताही प्रश्न विशेष विभागाद्वारे तातडीने सोडविला जाईल.’
एंजल टॅक्सविषयी...
स्टार्टअप कंपन्यांवरील एंजल टॅक्सची तरतूद मागे घेण्यात येत असल्याची घोषणा सरकारने गेल्याच महिन्यात केली होती. बिगरसूचीबद्ध कंपन्यांकडून शेअर विक्रीच्या माध्यमातून उभारण्यात येणाºया भांडवलावर आकारण्यात येणाºया प्राप्तिकरास एंजल टॅक्स म्हटले
जाते. शुद्ध बाजार मूल्यापेक्षा
अधिक किमतीत विकलेल्या समभागांवर हा कर लावण्यात येतो. यापोटी येणारी अतिरिक्त रक्कम कंपनीचे उत्पन्न गृहीत धरून हा कर लावण्यात येतो. हा कर रद्द करण्याची मागणी स्टार्टअप कंपन्यांकडून होत होती.
स्टार्टअपशी संबंधित प्रकरणे अत्यंत काळजीपूर्वक हाताळा
सीबीडीटीचे आपल्या अधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:45 AM2019-09-25T02:45:48+5:302019-09-25T02:48:09+5:30