मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. या क्षेत्रात असे कर्मचारी आहेत की, ज्यांच्याकडे कौशल्याचा अभाव आहे. त्यामुळे आगामी काळात मध्यम व वरिष्ठ स्तरावर मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांत कपात होऊ शकते. कारण, यातील ६० ते ६५ टक्के कर्मचारी असे आहेत की, त्यांना प्रशिक्षित करता येणार नाही, असे मत कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कांडुला यांनी व्यक्त केले.
नास्कॉम लीडरशिप संमेलनात बोलताना कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कांडुला म्हणाले की, आयटी क्षेत्रात ही परिस्थिती असली तरी मी खूप निराशावादी नाही. हे काम आव्हानात्मक आहे. फ्रान्स कंपनीच्या भारतीय शाखेत १ लाख इंजिनीअर काम करत आहेत हे विशेष. आगामी काळात देशात मध्यम व वरिष्ठ स्तरावर मोठी बेरोजगारी दिसून येईल, असे संकेत त्यांनी दिले. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी या कंपन्यांनी निधीची तरतूद केलेली नाही.
दोन दशकांपूर्वी या क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या कर्मचाऱ्याला प्रति वर्ष २.२५ लाख रुपयांचे पॅकेज दिले जात होते. पण, आता किमान ३.५ लाख रुपये प्रति वर्ष एवढे पॅकेज देण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका सर्व्हेक्षणातून अशी माहिती समोर येत आहे की, एकूण इंजिनीअर्सपैकी ८० टक्के इंजिनीअर्स बेरोजगार आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)
लो ग्रेड इंजिनीअरिंग कॉलेज
कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कांडुला यांनी आयटीतील या कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, ३९ लाख आयटी कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी खालच्या दर्जाच्या (लो ग्रेड) इंजिनीअरिंग कॉलेजमधून आलेले असतात. उद्योग संघटना नास्कॉमने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे की, किमान १५ लाख आयटी कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षित करण्याची गरज आहे.
आयटी क्षेत्रावर टांगती तलवार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. या क्षेत्रात असे कर्मचारी आहेत की, ज्यांच्याकडे कौशल्याचा अभाव आहे. त्यामुळे आगामी
By admin | Published: February 20, 2017 01:00 AM2017-02-20T01:00:53+5:302017-02-20T01:00:53+5:30