मुंबई- दिवाळीचा सण पूर्ण देशात आनंदानं साजरा केला जातो. अनेक जण याच दिवसांतून चांगल्या वस्तू घरी आणतात. असं म्हणतात, दिवाळीच्या दिवसांतून वस्तू खरेदी केल्यास शुभ मानली जाते. विशेष म्हणजे शेअर बाजारातही गुंतवणूकदार आणि कोट्यधीश लोकांना करोडो रुपये कमावण्याची सुवर्ण संधी असते. गेल्या अनेक वर्षांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या मुहूर्त ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. मुहूर्त ट्रेडिंगबद्दल माहिती जाणून घेऊयात.
काय असतं मुहूर्त ट्रेडिंग- दिवाळीबरोबरच नव्या वर्षाची सुरुवात होते. या दिवाळीबरोबरच संवत्सर 2075 सुरू होणार आहे. भारतीय परंपरेनुसार देशातील अनेक भागात दिवाळीबरोबरच नव्या वर्षाची सुरुवात होते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात स्पेशल शेअर ट्रेडिंग केलं जातं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई)मध्ये मुहूर्त ट्रेडिंग सुरू होणार आहे. संध्याकाळी साधारणतः पाच वाजता मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात होते आणि साडेसहा वाजता संपते. या दिवशी शेअर बाजारात सामान्य ट्रेडिंग 5.30 ते 6.30 वाजता होते. यादरम्यान तुम्ही शेअर खरेदी अथवा विकू शकता. तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर संध्याकाळी 5.30 ते 6.30 पर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई)मध्ये संध्याकाळी 4 ते 4.45पर्यंत शेअरचे भाव वधारण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 4.45 ते 5.30 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन होणार आहे. त्यानंतर ट्रेडिंग सुरू होईल. दोन्ही शेअर बाजारांसाठी बुधवारचा दिवस विशेष आहे.
पैसा कमावण्याची सुवर्णसंधी- तज्ज्ञ सांगतात, मुहूर्त ट्रेडिंगच्या मुहूर्तावर शेअर बाजारात पैसे गुंतवणं शुभ मानलं जातं. खासकरून श्रीमंत लोक या दिवशी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करतात. अशातच ते छोट्या गुंतवणुकीवरही जास्त पैसे कमावतात. शेअर बाजारातील तज्ज्ञ विकास सेठी यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सुंदरम फास्टनर्सचे शेअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मारुती सुझुकीचे शेअर्सची वधारतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मुहूर्त ट्रेडिंगच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे. मुहूर्त ट्रेडिंगच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदार शुभ मानतात. या दिवशी बरेच जण शेअर्स खरेदी करतात.
...तासाभरात कसे बनाल करोडपती, जाणून घ्या काय आहे शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग ?
दिवाळीचा सण पूर्ण देशात आनंदानं साजरा केला जातो. अनेक जण याच दिवसांतून चांगल्या वस्तू घरी आणतात.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:32 PM2018-11-07T15:32:04+5:302018-11-07T16:22:06+5:30