Join us  

ऑनलाइन फसवणुकीची हॅपी दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 9:15 AM

मुद्द्याची गोष्ट : सध्या सणांचा माहोल आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदी करताना अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक फसवणुकीस बळी पडू शकतात. त्यामुळे खरेदी करताना सावध राहा. शांतपणे सर्व गोष्टी नीट पाहा आणि मगच शॉपिंग करा आणि फसवणूक टाळा.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधीसंगणकीय प्रणालीच्या माध्यमातून विविध प्रकारचे नवनवे सापळे रचत सामान्य माणसांना गंडा घालण्याच्या बातम्या सध्या आपण सातत्याने वाचत आहोत; पण आता या संगणकीय प्रणालीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचे बळ प्राप्त झाल्यामुळे आता सायबर गुन्हेगार आणखी नवनवे मार्ग शोधून काढत सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. आगामी काळात असलेल्या दसरा-दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदी करताना अनेकजण सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक फसवणुकीस बळी पडू शकतात. त्यामुळे खरेदी करताना सावध रहा. शांतपणे सर्व गोष्टी नीट पाहा आणि मगच शॉपिंग करा. सायबर गुन्हेगारांनी अलीकडे ज्या नव्या पद्धतीने लोकांना गंडा घातला आहे, त्यांतील काहींची कार्यपद्धती देत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा हा लेख.

बँकांचीही बोगस ॲप- अलीकडे काही सायबरगुन्हेगारांनी बँकेच्या नावाशी आणि साधर्म्य साधतील अशी ॲप तयार केली आहेत.- अनेकांना मूळ ॲप व बनावट ॲप यांमधील फरक पटकन लक्षात येत नाही. लोक साइन अप करून त्यावर आपले बँक खाते नंबरही टाकतात. - मात्र, अशा परिस्थितीत फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ॲप डाऊनलोड करताना नीट, खात्रीशीर व पडताळणी करून ते डाउनलोड करावे.कोणत्याही ॲपवर आपली माहितीसेव्ह नको- अनेक वेळा सोयीचे जाते म्हणून लोक आपली वैयक्तिक माहिती, कार्डाचे तपशील ॲपवर किंवा वेबसाइटवर सेव्ह करतात.- मात्र, सायबर गुन्हेगार ही माहिती एआयच्या माध्यमातून सहज प्राप्त करून पैशांचा अपहार करू शकतात.- त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने तपशील भरावा लागला तरी चालेल; पण तो तिथे सेव्ह न करणे हे उत्तम.

प्रथितयश ऑनलाइन ॲपसदृश ॲप तयार करणेआजच्या घडीला काही प्रमुख ॲपच्या माध्यमातून लोक प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंग करतात.या ॲप कंपन्यांतर्फे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर ऑफर्स सादर केल्या जातात. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार या ॲपसारखी दिसणारी ॲप तयार करून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक करतात.त्यामुळे ॲप डाउनलोड करताना ते नीट तपासून मगच डाउनलोड करावे.

क्यूआर कोड स्कॅन करताना...- एखाद्या उत्पादनाची खरेदी केल्यावर जर समोरच्याने तुम्हाला क्यूआर कोड पाठवला तर त्यावरून पैशांचा भरणा करू नका; कारण क्यूआर कोडद्वारे पैसे भरले तर त्यात सर्वाधिक फसवणुकीची शक्यता असते.- सामान्य दुकानांत समोरासमोर क्यूआर कोडपेमेंट केले तर खात्री बाळगता येते.- मात्र, एखाद्या कंपनीने क्यूआर कोड पाठवला तर त्यावर पैसे न भरता खात्रीशीर ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पैशांचा भरणा करावा.

घरबसल्या झटपट शाॅपिंगचे पेव फुटले आहे. मात्र, त्या नादात अनेकांची बॅंक खाती रिकामी झाली आहेत.

एसएमएस शॉपिंग नको- अनेक प्रमुख ब्रँडच्या नावाने सध्या लोकांना एसएमएस येत आहेत.- त्यात विशिष्ट उत्पादनांवर घसघशीत सूट देण्याचे आमिष दिले जाते. तसेच ते शॉपिंग करण्यासाठी लिंकदेखील दिली जाते.- मात्र, हा सापळा असू शकतो. संबंधित उत्पादन घ्यायचे असेल तर कंपनीची वेबसाइट किंवा दुकान तपासा आणि तेथून खरेदी करावी.