Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात माेठ्या उसळीसह ‘हॅप्पी न्यू इयर’! 

शेअर बाजारात माेठ्या उसळीसह ‘हॅप्पी न्यू इयर’! 

मुंबई शेअर बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक हा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर त्यामध्ये चांगली वाढ होत जाऊन तो ५९,२६६ अंशांपर्यंत वर गेला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:34 AM2022-01-04T07:34:28+5:302022-01-04T07:34:34+5:30

मुंबई शेअर बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक हा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर त्यामध्ये चांगली वाढ होत जाऊन तो ५९,२६६ अंशांपर्यंत वर गेला. 

Happy New Year to the stock market! | शेअर बाजारात माेठ्या उसळीसह ‘हॅप्पी न्यू इयर’! 

शेअर बाजारात माेठ्या उसळीसह ‘हॅप्पी न्यू इयर’! 

मुंबई :  शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने उंच उडी घेतली आणि निफ्टीची वर झेपावत राहिला. त्यामुळे गुंतवणूकदारांची २०२२ ची सुरुवात जल्लोष आणि उत्साहाने झाली.  कोरोनाचे रुग्ण देशभर वाढत असल्याने आणि ओमायक्रॉनच्या भीतीने नववर्ष कसे जाणार, अशी भीती गुंतवणुकदारांना होती. पण  सोमवारी सकाळपासून शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांनी उसळी घेतली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. आरोग्य क्षेत्रातील चिंताजनक वातावरणाचा बाजारावर अजिबात परिणाम झाला नाही.  

शेअर बाजार
n मुंबई शेअर बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक हा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर त्यामध्ये चांगली वाढ होत जाऊन तो ५९,२६६ अंशांपर्यंत वर गेला. 
n बाजार बंद होताना हा निर्देशांक ५९,१८३.२२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ९२९.४० अंशांची वाढ झाली आहे. 
निफ्टी
n राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही चांगली वाढ झाली. 
n दिवसभरामध्ये यामध्ये १.५७ टक्के म्हणजे २७१.६५ अंशांची वाढ झाली. हा निर्देशांक १७,६२५.९० अंशांवर बंद झाला. 

बॅक निफ्टीमध्ये चांगली तेजी 
ऑटो क्षेत्रासाठीही आजचा दिवस चांगला ठरला. मारुतीचा शेअरनेही चांगली उंची गाठली. बॅक निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून आली.
यांनी खाल्ला मार   
आयनॉक्स आणि पीव्हीआर यांनी मात्र मार खाल्ला.

    यांचा दिवस सुगीचा
n आजचा दिवस आयटी क्षेत्रासाठी सुगीचा होता. विप्रो, लार्सन अॅण्ड ट्रुबो, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राच्या शेअर दरात चांगली वाढ झाली. 
n टीसीएस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक, इन्फोसिस एनटीपीसी यांच्या शेअरमध्ये सुमारे एक टक्का वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.         
n बजाज फिनसर्वच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. ॲक्सिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय या तीन बँकांचे शेअरही वधारल्याचे दिसून आले. 
बाजारामध्ये बँका, वित्तीयसंस्था, धातू कंपन्या तसेच माहिती व तंत्रज्ञान आस्थापनांच्या समभागांना मोठी मागणी असलेली दिसून आली. सेन्सेक्समधील केवळ पाचच कंपन्यांचे दर हे कमी होऊन बंद झाले, हे विशेष!
सोमवारी बाजाराच्या जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली.
 

Web Title: Happy New Year to the stock market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.