Lokmat Money > बिझनेस न्यूज > हरभराडाळ १,४०० रुपयांनी वधारली; सरकारने खरेदी केलेल्या मालाचा साठा बाहेर निघेना

हरभराडाळ १,४०० रुपयांनी वधारली; सरकारने खरेदी केलेल्या मालाचा साठा बाहेर निघेना

हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने आवक कमी होऊन हरभ-याच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:57 AM2018-07-29T04:57:31+5:302018-07-29T04:57:50+5:30

हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने आवक कमी होऊन हरभ-याच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Harbharadal raised Rs 1,400; Out of the goods procured by the government | हरभराडाळ १,४०० रुपयांनी वधारली; सरकारने खरेदी केलेल्या मालाचा साठा बाहेर निघेना

हरभराडाळ १,४०० रुपयांनी वधारली; सरकारने खरेदी केलेल्या मालाचा साठा बाहेर निघेना

- विजयकुमार सैतवाल

जळगाव : हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने आवक कमी होऊन हरभ-याच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. हरभरा डाळीच्या भावात देखील १४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.
यंदा सरकारने शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. हा माल सध्या सरकारने शासकीय गोदामांमध्ये ठेवला असून तो बाजारपेठ अथवा दालमिलसाठी उपलब्ध झालेला नाही. त्यात आता शेतकºयांकडील माल येणे बंद झाला आहे. या सर्वांमध्ये शेतक-यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून सरकारने विदेशातून आयात होणाºया मालावर बंदी घातली आहे. मध्यंतरी आवक वाढल्याने हरभरा ३००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आला होता. त्यात वाढ होऊन तो ३४०० ते ३५०० रुपयांवर आला. आवक कमी झाल्याने आठवडाभरात हरभºयाच्या भावात थेट ९०० ते एक हजार रुपयांनी वाढ होऊन तो ४३०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला.
मालाला भाव मिळण्यासाठी शासकीय गोदामातील हरभराही बाजारात येत नसल्याने आवक कमी झाली आहे, असे जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशचे अध्यक्ष प्रेम कोगटा म्हणाले.

- कच्च्या मालाचे भाव वाढल्याने हरभरा डाळीच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४००० ते ४४०० रुपये प्रती क्ंिवटल असलेली डाळ शनिवारी ५४०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.

Web Title: Harbharadal raised Rs 1,400; Out of the goods procured by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.