Join us  

मोदी सरकारची महत्वाची माहिती; कोट्यवधी LPG ग्राहकांना मिळणार दिलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 7:11 PM

LPG Customer : हरदीप सिंग पुरी यांनी केरळ विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व्हीडी सतीसन (VD Satheesa) यांच्या एका पत्राला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून उत्तर दिले आहे.

जर आपल्याकडे एलपीजी गॅस स‍िलेंडरचे कनेक्शन असेल तर ही बातमी आपल्याला दिलासा देणारी आहे. एलपीजी सिलिंडरच्या eKYC करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची कालमर्यादा नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी केरळ विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व्हीडी सतीसन (VD Satheesa) यांच्या एका पत्राला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून उत्तर दिले आहे.

'जवळपास 8 महिन्यापासून सुरू आहे केवायसी प्रोसेस' -सतीसन एका पत्राच्या माध्यमाने म्हणाले होते की, केवायसी आवश्यक आहे. मात्र, हे संबंध‍ित गॅस एजेन्स‍िंवर करण्यासाठी नियम‍ित एलपीजी ग्राहकांना त्रस्त केले जात आहे. याला उत्तर देत हरदीप सिंग पुरी म्हणाले, बनावट खाती बंद करण्यासाठी आणि कमर्श‍िअल गॅस सिलिंडरची बनावट बुकिंग रोखण्यासाठी ऑईल मार्केट‍िंग कंपन्या (OMC) एलपीजी क्लस्‍टरसाठी ईकेवायसी लागू करत आहेत. तसेच, ईकेवायसी प्रोसेस गेल्या आठ महिन्यांहूनही अधिक काळापासून चालू असल्याचेही पुरी यांनी स्पष्ट केले.

पुरी म्हणाले, "यामागचा उद्देश केवळ खऱ्या ग्राहकाला एलपीजी सर्व्हिस मिळाली एवढाच आहे. एलपीजी स‍िलिंडरच्या ड‍िलिव्हरीवेळी गॅस एजन्सीचा कर्मचारी ग्राहकाच्या कागदपत्रांची पडताळणी करतो. तो एका मोबाइल अॅपच्या माध्यमाने ग्राहकचे आधार क्रेडेन्शियल कॅप्‍चर करतो. या संपूर्ण प्रोसेसमध्ये कस्टमरच्या रज‍िस्‍टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येतो. याच्या माध्यमाने प्रोसेस पूर्ण केली जाऊ शकते. ग्राहक अपल्या सुविधेप्रमाणे ड‍िस्‍ट्रीब्‍यूटरच्या शोरूमवरही संपर्क साधू शकतो.

ई-केवायसीसाठी वेळेची मर्यादा नाही -याशिवाय, ग्राहक स्वतःही ऑईल मार्केट‍िंग कंपन्यांचे अॅप इंस्टॉल करून आपली केवायसी प्रोसेस पूर्ण करू शकतात. तसेच, ऑईल मार्केट‍िंग कंपन्या अथवा केंद्र सरकारकडून ईकेवायसी करण्यासाठी कसलीही कालमर्यादा नाही, असेही पुरी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडरकेंद्र सरकार