मुंबई : चीनमधील शेअर बाजारांत ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनीही बुधवारी माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८४ अंकांनी घसरला. चीनबरोबरच ग्रीकमधील अनिश्चिततेची भीतीही बाजारावर दिसून आली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ४८३.९७ अंकांनी अथवा १.७२ टक्क्यांनी घसरून २७,६८७.७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४७.७५ अंकांनी अथवा १.७४ टक्क्यांनी घसरून ८,३६३.0५ अंकांवर बंद झाला.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, ग्रीसमधील अनिश्चिततेमुळे बाजाराची धारणा आधीच नरम होती. त्यातच चीनमधील बाजारांच्या आपटीचा धक्का बसला. चीन सरकारने विविध उपाययोजना करूनही तेथील शेअर बाजार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळले.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २९ कंपन्यांचे समभाग घसरले. एकट्या एचयूएलचा समभाग वाढला. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत वेदांता, टाटा मोटर्स, हिंदाल्को, टाटा स्टील, एचडीएफससी आणि गेल यांचा समावेश आहे.
क्षेत्रवार विचार करता धातू क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. त्यापाठोपाठ वाहन, जमीन जुमला, बँकिंग, पीएसयू, तेल आणि गॅस तसेच आयटी या क्षेत्रांना झळ बसली.
ब्रोकरांनी सांगितले की, ग्रीक युरो झोनमधून बाहेर पडण्याची भीती अजूनही कायम आहे. त्यातच चीनमधील संकट ओढवले आहे. या परिस्थितीत बाजारात आणखी काही दिवस नरमाईचाच कल राहण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, काल विदेशी संस्थांनी शेअर बाजारातून २३.५४ कोटींची समभाग खरेदी केल्याचे आज जाहीर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट
झाले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्सची जबर आपटी
चीनमधील शेअर बाजारांत ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनीही बुधवारी माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८४ अंकांनी घसरला.
By admin | Published: July 8, 2015 11:34 PM2015-07-08T23:34:12+5:302015-07-08T23:34:12+5:30