Enviro Infra Engineers IPO Allotment : सीवेज ट्रिटमेंट प्लांट आणि इतर संबंधित सुविधा विकसित करणाऱ्या एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स या कंपनीच्या आयपीओसाठीच्या शेअर्सचं अलॉटमेंट आज निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यातील गुंतवणूकदारांना लॉटरी तत्त्वावर शेअर्स मिळतील आणि संपूर्ण प्रक्रिया रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली होईल.
आयपीओ कधी खुला झाला?
गेल्या आठवड्यात २२ नोव्हेंबररोजी या कंपनीचा आयपीओ उघडण्यात आला होता. गुंतवणूकदारांनी २६ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येणार होती. कंपनीनं १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी १४० ते १४८ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांनी या आयपीओला जोरदार प्रतिसाद दिला. मंगळवारी इश्यू बंद झाल्यानंतर हा आयपीओ ९० पट ओव्हरसब्सक्राइब झाल्याचम समोर आलं.
त्यात बहुतांश क्यूआयबींनी बोली लावली. ही श्रेणी १५७.०५ पट अधिक सब्सक्राइब झाला आहे. यानंतर एनआयआयनं बोली लावली. ही श्रेणी १५३.८० पटींपेक्षा अधिक सब्सक्राइब झाली. तर किरकोळ गुंतवणूकदारांची श्रेणीही २४.४८ पट ओव्हरसब्सक्राइब झाली.
अलॉटमेंट बीएसईवर कसं पाहाल?
या आयपीओची अलॉटमेंट स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला बीएसईच्या साईटवर जाऊन या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- स्टेप १: बीएसईच्या (https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx) या वेबसाईटला भेट द्या.
- स्टेप २: ड्रॉप डाउनमध्ये इश्यू नाव, म्हणजेच कंपनीचे नाव निवडा.
- स्टेप ३: अलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर किंवा पॅन नंबर टाका.
- यानंतर तुम्हाला माहिती मिळेल.
रजिस्ट्रारच्या साइटवरून कसं तपासाल
इश्यू रजिस्ट्रारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या आयपीओचं अलॉटमेंट स्टेटस देखील तपासू शकता. आयपीओचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस आहेत. या साईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- स्टेप १: बिगशेअर सर्व्हिसेसच्या वेबसाइटला (https://ipo.bigshareonline.com/IPO_Status.html) भेट द्या.
- स्टेप २: एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनीअर्स आयपीओ निवडा
- स्टेप ३: पॅन डिटेल्स एन्टर करा आणि स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्चवर क्लिक करा यानंतर तुम्हाला अलॉटमेंट स्टेटसची माहिती मिळेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)