Lokmat Money > बिझनेस न्यूज > टिकवावी लागेल नोकरी, आयटीत धोक्याची घंटा

टिकवावी लागेल नोकरी, आयटीत धोक्याची घंटा

इक्रा रेटिंग्जने अंदाजात म्हटले आहे की, चालू वित्त वर्षात आयटी सेवाक्षेत्राच्या नफ्यात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे परिचालन लाभ प्रमाण १ टक्का कमी होऊन २० ते २१ टक्के राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:53 AM2023-08-31T01:53:43+5:302023-08-31T01:54:15+5:30

इक्रा रेटिंग्जने अंदाजात म्हटले आहे की, चालू वित्त वर्षात आयटी सेवाक्षेत्राच्या नफ्यात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे परिचालन लाभ प्रमाण १ टक्का कमी होऊन २० ते २१ टक्के राहील.

Have to keep the job, the alarm bells in IT | टिकवावी लागेल नोकरी, आयटीत धोक्याची घंटा

टिकवावी लागेल नोकरी, आयटीत धोक्याची घंटा

नवी दिल्ली : भारतातील आयटी सेवा क्षेत्राचा वृद्धिदर चालू वित्त वर्षात घटून ३ टक्के होईल, असे इक्रा रेटिंग्जने म्हटले आहे. गेल्या वर्षी हा वृद्धिदर ९.२ टक्के होता. 
इक्रा रेटिंग्जने अंदाजात म्हटले आहे की, चालू वित्त वर्षात आयटी सेवाक्षेत्राच्या नफ्यात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे परिचालन लाभ प्रमाण १ टक्का कमी होऊन २० ते २१ टक्के राहील. मागणी घटल्यामुळे या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. प्रमुख आयटी बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे बिगर-महत्त्वाच्या प्रकल्पांत अडथळे येत आहेत. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा, किरकोळ विक्री, तंत्रज्ञान आणि दूरसंचार यांसारख्या प्रमुख क्षेत्रांनी आयटी खर्चात कपात केली आहे.

अमेरिका, युरोपातील अडथळ्यांचा फटका
इक्राने म्हटले की, अमेरिका आणि युरोपातील प्रमुख बाजारांतील आर्थिक अडथळ्यांचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्यांना बसला आहे. २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीपासून २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत या कंपन्यांचा वृद्धीदर 
घसरला आहे.

Web Title: Have to keep the job, the alarm bells in IT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.