Join us

टिकवावी लागेल नोकरी, आयटीत धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 1:53 AM

इक्रा रेटिंग्जने अंदाजात म्हटले आहे की, चालू वित्त वर्षात आयटी सेवाक्षेत्राच्या नफ्यात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे परिचालन लाभ प्रमाण १ टक्का कमी होऊन २० ते २१ टक्के राहील.

नवी दिल्ली : भारतातील आयटी सेवा क्षेत्राचा वृद्धिदर चालू वित्त वर्षात घटून ३ टक्के होईल, असे इक्रा रेटिंग्जने म्हटले आहे. गेल्या वर्षी हा वृद्धिदर ९.२ टक्के होता. इक्रा रेटिंग्जने अंदाजात म्हटले आहे की, चालू वित्त वर्षात आयटी सेवाक्षेत्राच्या नफ्यात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे परिचालन लाभ प्रमाण १ टक्का कमी होऊन २० ते २१ टक्के राहील. मागणी घटल्यामुळे या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. प्रमुख आयटी बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे बिगर-महत्त्वाच्या प्रकल्पांत अडथळे येत आहेत. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा, किरकोळ विक्री, तंत्रज्ञान आणि दूरसंचार यांसारख्या प्रमुख क्षेत्रांनी आयटी खर्चात कपात केली आहे.

अमेरिका, युरोपातील अडथळ्यांचा फटकाइक्राने म्हटले की, अमेरिका आणि युरोपातील प्रमुख बाजारांतील आर्थिक अडथळ्यांचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्यांना बसला आहे. २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीपासून २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत या कंपन्यांचा वृद्धीदर घसरला आहे.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञाननोकरी