Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरूनच काम करावे लागणार? कर्मचाऱ्यांनी कामाचे तास लवचीक ठेवण्याचे केले सूचित 

घरूनच काम करावे लागणार? कर्मचाऱ्यांनी कामाचे तास लवचीक ठेवण्याचे केले सूचित 

Work From Home : कोरोनापूर्व स्थिती निर्माण झाली असली तरी अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास प्राधान्य न देता घरूनच काम करण्यास पसंती दर्शवल्याचे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पाहणीत आढळून आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 10:19 AM2022-01-01T10:19:31+5:302022-01-01T10:49:55+5:30

Work From Home : कोरोनापूर्व स्थिती निर्माण झाली असली तरी अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास प्राधान्य न देता घरूनच काम करण्यास पसंती दर्शवल्याचे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पाहणीत आढळून आले आहे.

Have to work from home? Indicates working hours to be flexible | घरूनच काम करावे लागणार? कर्मचाऱ्यांनी कामाचे तास लवचीक ठेवण्याचे केले सूचित 

घरूनच काम करावे लागणार? कर्मचाऱ्यांनी कामाचे तास लवचीक ठेवण्याचे केले सूचित 

कोरोनामुळे घरून काम करण्याच्या संस्कृतीला आता कर्मचारी सरावू लागले आहेत. त्यामुळे कोरोनापूर्व स्थिती निर्माण झाली असली तरी अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास प्राधान्य न देता घरूनच काम करण्यास पसंती दर्शवल्याचे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पाहणीत आढळून आले आहे.

या परिस्थितीत अनेक कर्मचाऱ्यांनी घर आणि काम यांच्यात संतुलन साधण्यासाठी कामाचे तास लवचीक (फ्लेक्झिबल वर्क अवर्स) ठेवण्याचे सूचित केले आहे. नियोक्त्यांनीही अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला मान देत लवचीक तासांची मुभा दिली आहे. त्यामुळे नियोक्ता आपल्या आरोग्यासाठी सजग असल्याचा संदेशही कर्मचाऱ्यांमध्ये गेला.

फेल्क्झिबल वर्किंग अवर्स हे यंदाचे वैशिष्ट्य ठरू शकते. कर्मचाऱ्याच्या कामाला कौतुकाची पावती मिळू शकते. नियोक्त्याने आपल्या कामाचे कौतुक केले तर कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढते, हे एक मानसशास्त्र आहे. कोरोनाकाळात त्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

८१% कर्मचाऱ्यांनी त्यांनी काम केल्यास त्याचे कौतुक होईल, असा आशावाद एका सर्वेक्षणात व्यक्त केला. मात्र, आता कर्मचाऱ्यांना तसा भरवसा राहिलेला नाही. आपली नोकरी टिकते की नाही, हीच त्यांची चिंत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या कामाला कौतुकाची पावती देणे यंदाच्या वर्षी योग्य ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये असुरिक्षततेची भावना नष्ट करणे
ज्यांची मालकाशी, नियोक्त्याशी ओळख आहे, संवाद आहे त्यांच्यात सुरक्षिततेची भावना असते.ज्यांचा असा कनेक्ट नसतो त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशा कर्मचाऱ्यांमधील असुरक्षिततेची भावना नष्ट करण्यासाठी कर्मचारीकेंद्री उपक्रमांची आखणी व्यवस्थापनाकडून केली जाणे अपेक्षित असते.

Web Title: Have to work from home? Indicates working hours to be flexible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.