अलीकडच्या काळात परदेशात प्रवास करायचा असो किंवा नसो पण संधी आली तर दवडली जाऊ नये म्हणून जवळपास प्रत्येक जण हमखास पासपोर्ट काढून ठेवतो. मुंबईसारख्या शहरात तर दिवसाकाठी तब्बल पाच हजार लोक पासपोर्ट काढल्याची नोंद आहे. पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रियादेखील आता वेगवान झाल्याने किमान सात ते कमाल पंधरा दिवसांत लोकांना पासपोर्ट हाती पडत आहे.
पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नसेल तर तो तुम्हाला आता विनासायास काढता येईल.
दीड कोटी लोकांची नोंद२०२३ मध्ये मुंबईत दीड कोटीपेक्षा जास्त पासपोर्टचे वितरण झाल्याचे समजते. यामध्ये प्रामुख्याने नूतनीकरणासाठी आलेल्या पासपोर्टची संख्या अधिक आहे, पण नव्याने पासपोर्ट काढण्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
किती येतो खर्च ? सामान्य प्रक्रियेद्वारे काढण्यात येणाऱ्या ३६ पानांच्या पासपोर्टला आणि ज्याची वैधता १० वर्षांची आहे. त्याकरिता १५०० रुपये शुल्क आकारले जाते. हाच पासपोर्ट जर तत्काळ श्रेणीमध्ये काढायचा असले तर १५०० रुपयांचे अर्ज शुल्क व दोन हजार रुपये तत्काळचे शुल्क असे साडेतीन हजार रुपये आकारले जातात; मात्र तुमचा परदेश प्रवास जास्त होत असेल तर ३० पानांऐवजी तुम्हाला १० वर्षे मुदतीचा ६० पानांचा पासपोर्ट देखील काढता येतो. याकरिता सामान्य श्रेणीतील पासपोर्टसाठी दोन हजार रुपये तर तत्काळ श्रेणीतील पासपोर्टसाठी चार हजार रुपये आकारले जातात. काय लागतात कागदपत्रे?पासपोर्टसाठी तुम्हाला सध्याचा निवासी पुरावा, कायमस्वरूपी निवासी पुरावा, विजेचे बिल, जन्मतारीख पुरावा, आधार कार्ड हे आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे जर आधीचा पासपोर्ट असेल तर तो देखील सोबत जोडावा लागेल.
काय लागतात कागदपत्रे?पासपोर्टसाठी तुम्हाला सध्याचा निवासी पुरावा, कायमस्वरूपी निवासी पुरावा, विजेचे बिल, जन्मतारीख पुरावा, आधार कार्ड हे आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे जर आधीचा पासपोर्ट असेल तर तो देखील सोबत जोडावा लागेल. ऑनलाईन अर्ज भरताना काय काळजी घ्याल?पासपोर्ट विभागाची स्वतःची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊनच अर्जदारांनी अर्ज भरावा; मात्र अलीकडच्या काळात पासपोर्टसाठी अर्ज करा किंवा पासपोर्ट काढा अशा बनावट वेबसाईट सुरू केल्या आहेत.
अशा वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज भरू नये किंवा त्यावर पैसे देखील भरू नयेत. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमची पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट झाल्याचे सांगून फसवणूक करतात.