Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्षभरात तुम्ही साेने विकले आहे का?; नफ्यावर द्यावा लागेल कॅपिटल गेन टॅक्स

वर्षभरात तुम्ही साेने विकले आहे का?; नफ्यावर द्यावा लागेल कॅपिटल गेन टॅक्स

नफ्यावर तुमच्या एकूण उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर द्यावा लागताे. तर तीन वर्षांनी विक्री केल्यास लाँग टर्म कॅपिटल गेननुसार २०.८ टक्के कर लागताे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:20 AM2023-07-12T07:20:52+5:302023-07-12T07:21:22+5:30

नफ्यावर तुमच्या एकूण उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर द्यावा लागताे. तर तीन वर्षांनी विक्री केल्यास लाँग टर्म कॅपिटल गेननुसार २०.८ टक्के कर लागताे.

Have you sold gold during the year?; Capital gain tax has to be paid on the profit | वर्षभरात तुम्ही साेने विकले आहे का?; नफ्यावर द्यावा लागेल कॅपिटल गेन टॅक्स

वर्षभरात तुम्ही साेने विकले आहे का?; नफ्यावर द्यावा लागेल कॅपिटल गेन टॅक्स

नवी दिल्ली - आयकर विवरण दाखल करताना अनेक गाेष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यात कॅपिटल गेन्स हा भागही येताे. वर्षभरात तुम्ही विकलेल्या संपत्तीवर कॅपिटल गेन कर द्यावा लागताे. अशा संपत्तीमध्ये साेन्याचा समावेश आहे. साेने विक्रीवर कॅपिटल गेन कर दिला नाही, तर ती करचाेरी मानली जाते. 

प्रत्यक्ष जवळचे साेने, दागिने, नाणे व इतर साेन्याच्या वस्तुंचा प्रत्यक्ष जवळच्या साेन्यात समावेश हाेताे. खरेदीनंतर ३ वर्षांच्या आत ते विकल्यास शाॅर्ट टर्म कॅपिटल गेन मानले जाते. त्यातील नफ्यावर तुमच्या एकूण उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर द्यावा लागताे. तर तीन वर्षांनी विक्री केल्यास लाँग टर्म कॅपिटल गेननुसार २०.८ टक्के कर लागताे.

साॅवरेन गाेल्ड बाँड
बाँडची मॅच्युरिटी कालावधीपूर्वी विक्री केल्यास जवळच्या साेन्याची विक्री केल्याप्रमाणे कर लागताे. बाँडवर २.५ टक्के दराने मिळणाऱ्या व्याजावरही उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर आकारला जाताे. ८ वर्षांनी मिळणारा कॅपिटल गेन पूर्णपणे करमुक्त असताे.

गाेल्ड म्युच्युअल फंड अथवा गाेल्ड ईटीएफ
या प्रकारात किमान ३ वर्षे गुंतवणूक कायम ठेवावी लागते. त्यापूर्वी विक्री केल्यास शाॅर्ट टर्म कॅपिटल गेननुसार कर द्यावा लागतो. तर त्यानंतर केलेल्या विक्रीवर लाँग टर्म कॅपिटल गेननुसार कर द्यावा लागताे.

लाेकांनी भरला ४.७५ लाख काेटींचा कर
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलन १६ टक्क्यांनी वाढून ४.७५ लाख काेटी रुपयांवर झाले आहे. तर, २ काेटी लाेकांनी विवरण दाखल केले आहे.

Web Title: Have you sold gold during the year?; Capital gain tax has to be paid on the profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं