Join us

होम लोन घेतलंय...? तर एवढं करा, राहणार नाही दर महिन्याला EMI चं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 5:29 PM

खरे तर, दर महिन्याला एक मोठी रक्कम ईएमआय म्हणून चुकवणे सोपी गोष्ट नाही. मात्र आपम योग्य प्लॅनिंग केले तर हे सोपे होऊ शकते. 

घर खरेदी केल्यानंतर अनेक लोक घरासाठी घेतलेल्या कर्जाचे इएमआय भरून-भरून थकतात. त्रस्त होतात. खरे तर, दर महिन्याला एक मोठी रक्कम ईएमआय म्हणून चुकवणे सोपी गोष्ट नाही. मात्र आपम योग्य प्लॅनिंग केले तर हे सोपे होऊ शकते. 

EMI कमी करा - जर तुम्हाला दर महिन्याला EMI भरणे त्रासदायक होत असेल, तर तुमच्या मासिक EMIची रक्कम कमी करून घेऊ शकता. यामुळे तुमचे टेन्योर वाढेल. मात्र, कर्जाचा कालावधी वाढल्याने तुम्हाला अधिक व्याज भरावे लागेल.

लोन ट्रान्सफर करा - तुम्ही लोन ट्रान्सफर सुविधेचाही लाभ घेऊ शकता. मात्र यासाठी तुमचे री-पेमेंट रेकॉर्ड चांगले असायला हवे. यामुळे तुमच्या गृहकर्जाची शिल्लक रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर होईल. अशात आपल्याला, नवीन बँकेत कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते.

लोन प्री-पेमेंटची सुविधा -याशिवाय आपण होम लोन प्री-पेमेंटदेखील करू शकता. अर्थात जेव्हा आपल्याकडे अधिकचा पैसा असेल, तेव्हा आपण प्री-पेमेंट करू शकता. यामुळे आपल्या लोनचे ईएमआय बरेच कमी होते. आपण जेव्हा प्रीपेमेंट करता, तेव्हा ती रक्कम आपल्या थेट प्रिंसिपल अमाउंटमधून कमी होते. अशा पद्धतीने आपला मंथली इएमआय देखील कमी होऊ शकतो.

लोन री-स्ट्रक्चर - आपण आपले लोन रीस्ट्रक्चर देखील करू शकता. यामुळे यापली ईएमआय वाढेल, मात्र लोन लवकर संपेल. यामुळे आपल्याला व्याजही कमी द्यावे लागेल. 

किती असायला हवा EMI? -आपण आपल्या पगाराच्या केवळ 20 ते 25 टक्के एवढाच ईएमआय ठेवायला हवा. याहून अधिक ईएमआय असेल तर आपले खर्च बिघडतील. तसेच, जर आपल्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी नसेल, तर आपण ही रक्कम 30 ते 35 टक्क्यांपर्यंतही ठेऊ शकता. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजनबँकपैसा