Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनेक बँकांत खाती असल्यास होऊ शकते आर्थिक नुकसान

अनेक बँकांत खाती असल्यास होऊ शकते आर्थिक नुकसान

bank accounts : कर व गुंतवणूक तज्ज्ञही एकच बँक खाते ठेवण्याचा सल्ला देतात, कारण एकच खाते असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरणे सोपे होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:44 AM2021-08-17T07:44:54+5:302021-08-17T07:45:11+5:30

bank accounts : कर व गुंतवणूक तज्ज्ञही एकच बँक खाते ठेवण्याचा सल्ला देतात, कारण एकच खाते असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरणे सोपे होते. 

Having multiple bank accounts can cause financial loss | अनेक बँकांत खाती असल्यास होऊ शकते आर्थिक नुकसान

अनेक बँकांत खाती असल्यास होऊ शकते आर्थिक नुकसान

नवी दिल्ली : अनेक बँकांत खाती असल्यास खातेधारकास आर्थिक झळ बसू शकते. कर व गुंतवणूक तज्ज्ञही एकच बँक खाते ठेवण्याचा सल्ला देतात, कारण एकच खाते असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरणे सोपे होते. 
जाणकारांनी सांगितले की, पूर्वी बँक खात्यासाठी कोणताही खर्च खातेधारकास येत नव्हता; पण आता बँका मेन्टेनन्स चार्ज, डेबिट कार्ड चार्ज, एसएमएस चार्ज, सर्व्हिस चार्ज, मिनिमम बॅलन्स चार्ज इत्यादी नावांनी अनेक प्रकारचे शुल्क वसूल करतात. 
अनेक बँकांत खाती असल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका त्यातून बसणे अपरिहार्य आहे. केवळ मिनिमम बॅलन्ससाठीच मोठी रक्कम बँक खात्यांत अडकून पडते.   कर सल्लागारांच्या मते, एकच बँक खाते असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीचे हिशेब काढणे सोपे होते. अनेक खाती असल्यास हिशेब क्लिष्ट होतात. त्यात काही चुका झाल्यास करदात्यास नोटीस येऊ शकते. बँक खात्यात एक वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यास ते खाते ‘इनॲक्टिव्ह’ 
होते. 

Web Title: Having multiple bank accounts can cause financial loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक