नवी दिल्ली : बिगरसबसिडीच्या सिलिंडरची किंमत दर सिलिंडरमागे १६.५० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांनी सरकारला त्याचे स्पष्टीकरण सुचले असून, या दरवाढीचा फटका फक्त १ टक्क्यापेक्षाही कमी ग्राहकांना बसेल, असे सरकारने आज म्हटले आहे.
सिलिंडरचे ग्राहक अनुदानित १२ सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर सबसिडी नसलेले विनाअनुदानित सिलिंडर घेतात. या सिलिंडरची किंमत ९२२.५० रु. नवी दिल्ली येथे ठेवण्यात आली असून, १ जुलैपासून ती लागू झाली आहे. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक दरवर्षी १२ सिलिंडर वापरतात, त्यामुळे या दरवाढीचा फटका त्यांना बसण्याची काही शक्यता नाही. दरवर्षी १२ सिलिंडरपेक्षा जास्त सिलिंडर वापरणाऱ्या १ टक्क्यापेक्षाही कमी ग्राहकांना ही किंमत द्यावी लागेल, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सबसिडी असणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत प्रती सिलिंडर ४१४ रु. कायम आहे. तेल कंपन्या बिगर सबसिडीच्या गॅसची किंमत दर महिन्याला उत्पादनानुसार बदलतात, असेही या निवेदनात सरकारने म्हटले आहे. इराक समस्येमुळे जगभरात तेलाच्या किंमती वाढल्या असून रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात महाग झालेली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दरवाढीचा फटका १ टक्क्यांना
सिलिंडरचे ग्राहक अनुदानित १२ सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर सबसिडी नसलेले विनाअनुदानित सिलिंडर घेतात.
By admin | Published: July 4, 2014 05:53 AM2014-07-04T05:53:49+5:302014-07-04T05:53:49+5:30