नवी दिल्ली : एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये गुतंवणूक करुन जास्त व्याजदर मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. किचन अप्लायंस फर्म Hawkins cooker कंपनीने एक नफा मिळवून येणारी स्कीम आणली आहे.
कंपनीने 12 महिन्यांपासून 36 महिन्यांच्या कालावधीसाठी एफडी प्लॅन आणला आहे. अनेक बँकांमध्ये या कालावधीत एफडीवर 7.50 टक्के किंवा यापेक्षा कमी व्याज मिळते. मात्र, Hawkins cooker कंपनी आपल्या या प्लॅनमध्ये 10.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. कंपनीचा हा प्लॅन 18 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे.
असे असणार व्याजदर...Hawkins cooker विविध कालावधीनुसार 10 टक्के ते 10.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 10 टक्के व्याजदर, 24 महिन्यांच्या कालावधीसाठी 10.25 टक्के व्याजदर आणि 36 महिन्यांच्या कालावधीसाठी 10.50 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत.
दोन प्रकारे करू शकता एफडी...Hawkins cooker कंपनीच्या या स्कीममध्ये दोन प्रकारामध्ये एफडी केली जाऊ शकते. एक म्हणजे, गुंतवलेला पैशा एकत्र म्यॅच्युरिटीच्या वेळी घेऊ शकता. आणि दुसरे म्हणजे, व्याज मध्येच घेऊ शकता. यामध्ये आपल्याला मूळ रक्कम म्यॅच्युरिटीवेळी घेता येते.
किमान गुंतवणूक 25 हजार...या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 25 हजार रुपये आहे. यानंतर तुम्ही 1,000 रुपयांच्या दुपटीने रक्कमेत वाढ करु शकता. या गुंतवणूकची कालावधी 12, 24 आणि 36 महिने आहे.
असा होणार फायदा...जर तुम्ही किमान रक्कम 25,000 रुपयांची एफडी करत असाल आणि म्यॅच्युरिटीवर रक्कम काढत असाल तर 12 महिन्यांत आपल्याला 10 टक्के व्याजासह 27,618 रुपये मिळणार आहेत. किमान रक्कमेवर जर 24 महिन्याची एफडी केली तर आपल्याला म्यॅच्युरिटीनंतर 10.25 टक्के व्याजदराने 30,661 रुपये मिळणार आहेत. तसेच, जर किमान रक्कम 36 महिन्यासांठी एफडी केली तर म्यॅच्युरिटीनंतर आपल्याला 10.50 टक्के व्याजदराने 34,210 रुपये मिळणार आहेत.
कंपनीची स्टेबल रेटिंग आहे...कंपनीच्या माहितीनुसार, एफडी स्कीमला रेटिंग एजेन्सी इकरा (ICRA) कडून एमएए म्हणजेच स्टेबल रेटिंग मिळाली आहे. ही रेंटिग हाय क्वालिटी आणि लो क्रेडिट रिस्क दर्शविते.
(टिप: कोठेही गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या! )