नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचसीएलने (HCL) गेल्या वर्षी सीईओ (CEO) सी. विजयकुमार (C Vijayakumar) यांना वेतन म्हणून एकूण 123 कोटी रुपये दिल्याचे कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, सी. विजय कुमार हे भारतातील आयटी उद्योगात सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत.
कंपनीच्या अहवालानुसार, सी. विजयकुमार यांना 2-वर्षांचे लाँग टर्म इंन्सेटिव्ह (LTI) देखील देण्यात आले होते, जे 12.5 मिलियन डॉलर होते. दरम्यान, जेव्हा कंपनीचा अधिकारी आपले निर्धारित टार्गेट पूर्ण करतो, तेव्हा लाँग टर्म इंन्सेटिव्ह दिला जातो. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये सी. विजयकुमार यांच्या पगारात कोणताही बदल झालेला नाही.
कोण आहेत सी. विजयकुमार?एचसीएलचे सीईओ सी. विजयकुमार यांचा जन्म 1967 मध्ये तमिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये झाला. तमिळनाडूतूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते आणि त्यांना लहान वयातच टेक्नॉलॉजीमध्ये विशेष आवड होती. त्यामुळे ग्रॅज्युएशनमध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची निवड केली. सी. विजयकुमार यांनी तामिळनाडूच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
1994 मध्ये ज्वाइन केले होते एचसीएलसी. विजयकुमार यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1994 मध्ये सिनिअर टेक्नॉलॉजी इंजिनीअर म्हणून एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये करिअरला सुरुवात केली. त्यानंतर मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ते पुढे जात राहिले. 2016 मध्ये त्यांना एचसीएलने चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) बनवले होते. तसेच, सी. विजयकुमार यांची गणना जगातील अव्वल टेक एक्सपर्ट्समध्ये केली जाते. त्यांना या क्षेत्राचे सखोल ज्ञान आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये कंपनीने त्यांना पदोन्नती दिली आणि सीईओ म्हणून नियुक्त केले.
दुसऱ्या नंबरवर विप्रोचे सीईओजर इतर कंपन्यांच्या सीईओंच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर, विप्रोचे सीईओ थियरी डेलापोर्टे हे गेल्या वर्षी सर्वाधिक पगार मिळवणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. थिएरी डेलापोर्टे यांचा वार्षिक पगार 10.5 मिलियन डॉलर आहे. याचबरोबर, इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलील पारेख तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना पगार म्हणून 10.2 मिलियन डॉलर मिळाले.