HCL Tech Shares: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी, HCL टेकच्या नेट प्रॉफिटमध्ये दुसऱ्या तिमाहीत 10% वाढ झाली आहे, तर रेव्हेन्यू ग्रोथही 8% ने वाढली आहे. कंपनीच्या वाढीचा परिणाम शुक्रवारी शेअर्सवर दिसून आला. एचसीएल टेकचे शेअर्स NSE वर घसरणीसह उघडले, परंतु ट्रेडिंगच्या पहिल्या तासात 3.5% वाढले.
HCL Technologies ने गुरुवारी संध्याकाळी सप्टेंबर 2023 ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की, या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 10% ने वाढून रु. 3,832 कोटी झाला, जो मागील वर्षी याच कालावधीत रु. 3,489 कोटी होता. तसेच, दुसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग रेव्हेन्यू वार्षिक आधारावर 8% ने वाढून रु. 26,672 कोटी झाला, जो मागील वर्षी याच तिमाहीत रु. 24,686 कोटी होता.
सप्टेंबर तिमाहीतील मजबूत कमाईनंतर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी HCL टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने NSE वर दिवसाच्या सर्वोच्च स्तरावर 3.5% ने झेप घेतली. गुरुवारी शेअर 1,223.75 रुपये प्रति शेअरच्या किमतीसह बंद झाला होता. शेअरमधील सकारात्मक वाढ शुक्रवारीही कायम राहिली.