Join us

'या' बँकेत खाते असल्यास दोन दिवसांत कामं उरका, 11 तास सुविधा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 9:42 AM

जर तुमचं खातं देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीमध्ये असल्यास आर्थिक व्यवहार दोन दिवसांत पूर्ण करा,

नवी दिल्लीः जर तुमचं खातं देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीमध्ये असल्यास आर्थिक व्यवहार दोन दिवसांत पूर्ण करा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना एसएमएस (SMS) पाठवून सूचना दिली आहे. 18 जानेवारी 2020ला ग्राहकांना बँकेची नेटबँकिंग (Net Banking), मोबाइल बँकिंग (Mobile Banking), फोन बँकिंग (Phone Banking) आणि आयव्हीआरवर क्रेडिट कार्ड सारख्या सुविधांचा लाभ घेता येणार नाही.  11 तास बंद राहणार सुविधाशेड्युल मेंटनन्सच्या कारणास्तव 18 जानेवारी 2020ला रात्री 1 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत नेटबँकिंग (Net Banking), मोबाइल बँकिंग (Mobile Banking), फोन बँकिंग (Phone Banking) आणि आयव्हीआरवर क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा बंद राहणार आहेत. बँक सदोदित ग्राहकांना सुरक्षित व्यवहारासाठी अलर्ट पाठवत असतं. कोणालाही देऊ नका बँकेतील खात्याची माहितीग्राहकांनी बँकेतल्या खात्याशीसंबंधित पासवर्ड आणि माहिती सार्वजनिक करू नये, असं एक ट्विट करत बँकेनं सांगितलं आहे. बँक कधीही अशा प्रकारची माहिती मागत नाही. गेल्या महिन्यात तांत्रिक कारणास्तव HDFC बँकेची मोबाइल अॅप आणि नेट बँकिंग सुविधा 2 दिवस ठप्प होती. त्यामुळे बँकेच्या लाखो ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. तांत्रिक घोळामुळे आमची सुविधा प्रभावित झाली आहे. आमचे तज्ज्ञ ही सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही लवकरच ग्राहकांना उत्तम सुविधा पुरवू, असा आम्हाला विश्वास असल्याचंही बँकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.  

टॅग्स :बँक