जर तुम्ही कर्ज घेण्याच्या विचारात आहात किंवा तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. देशातील दोन मोठ्या बँका HDFC आणि कॅनरा बँकेनं आपल्या MCLR मध्ये कपात केली आहे. या कपातीनंतर या बँकांद्वारे घेतल्या जाणाऱ्या किंवा घेतलेल्या कर्जांचे हप्ते कमी होणार आहेत. HDFC बँकें आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ इंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल केले आहेत. बंकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हे दर ८ फेब्रुवारीपासूनच लागू करण्यात आले आहेत. HDFC बँकेचं ओव्हरनाईट एमसीएलआर ६.८५ टक्के आहे. तर एका महिन्याच्या कालावधीसाठी ते ६.९ टक्के आहे. दुसरीकडे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एमसीएलआर ६.९५ टक्के आणि ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ७.०५ टक्के इतकं आहे. बँकेत एका वर्षाच्या कालावधीसाठी हा ७.२ टक्के, २ वर्षआंच्या कालावधीसाठी ७.३ टक्के आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी ७.४ टक्के इतकं आहे.दुसरीकडे HDFC बँकेनंतर कॅनरा बँकेनंही एक दिवस आणि एका महिन्याच्या एमसीएलआरच्या दरात ०.१ टक्क्यांची कपात केली आहे. सोमवारी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आता ओव्हरनाईट आणि एका महिन्यासाठई एमसीएलआर आता ६.७ टक्के आहे. तर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एमसीएलआर ६.९५ टक्के, सहा महिन्यांसाठी ७.३० टक्के, एका वर्षासाठी ७.३५ टक्के इतका आहे. तर बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आता RLLR ६.९० टक्क्यांवर कायम असल्याचं सांगण्यात आलं.काय आहे MLCR?बँकेद्वारे एमएलसीआर कमी करण्याचा फायदा नवी कर्ज घेणाऱ्यांसहित २०१६ या वर्षानंतर कर्ज घेणाऱ्यांना होतो. एप्रिल २०१६ पूर्वी रिझर्व्ह बँकेद्वारे कर्ज देण्यासाठी ठरवण्यात आलेलं मिनिमम रेट हा बेस रेट म्हणून ओळखला जायचा. याचाच अर्थ बँक ग्राहकांना यापेक्षा कमी दरात कर्ज देऊ शकत नव्हत्या. परंतु १ एप्रिल २०१६ मध्ये बँकिंग सिस्टममध्ये एमएलसीआर लागू करण्यात आला आणि हाच कर्जासाठी किमान दर झाला. त्यानंतर एमएलसीआरच्या आधारेच कर्ज देण्यात येत आहे.
HDFC आणि कॅनरा बँकेनं कमी केला MCLR; तुमचा EMI होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 9:45 PM
ग्राहकांना मिळणार दिलासा, EMI चा भार होणार थोडा हलका
ठळक मुद्देग्राहकांना मिळणार दिलासा, EMI चा भार होणार थोडा हलकादोन्ही बँकांनी केली एमएलसीआरमध्ये कपात