खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC बँकेला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी HDFC बँकेचं अॅप डाऊन झाल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर बँकेनं आपल्या ग्राहकांना नेट बँकिंगच्या पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच याद्वारे आपली कामं पूर्ण करण्यास सांगितलं आहे.
"आम्ही प्राधान्यानं ही सम्सया सोडवण्यावर काम करत आहोत. लवकरच याबाबत एक अपड़ेट देण्यात येईल. ग्राहकांनी आपल्या ट्रान्झॅक्शन्ससाठी नेट बँकिंगच्या पर्यायाचा वापर करावा अशी विनंती आम्ही करत आहोत," असं बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
We are experiencing some issues on the MobileBanking App. We are looking into this on priority and will update shortly. Customers are requested to please use NetBanking to complete their transaction. Regret the inconvenience caused. Thank you.
— HDFC Bank News (@HDFCBankNews) June 15, 2021
काय म्हटलं बँकेनं?
"मोबाईल बँकिंग अॅपवर काही समस्या जाणवत आहे. प्राधान्यानं आम्ही ही समस्या सोडवण्याचं काम करत आहोत. लवकच आम्ही यासंदर्भात माहिती देऊ. ग्राहकांना आपल्या ट्रान्झॅक्शन्ससाठी नेट बँकिंगचा वापर करावा. असुविधेसाठी आम्हाला खेद आहे," असं बँकेचे प्रवक्ते राजीव बॅनर्जी म्हणाले.
यापूर्वीही काही वेळा HDFC बँकेला तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात एकदा बँकेची नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा अनेक तासांसाठी ठप्प झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता.