Join us

गुड न्यूज! 'ही' बँक उचलणार एक लाख कर्मचारी व कुटुंबीयांचा कोरोना लसीकरण खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 5:58 PM

बँकेने एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कुटुंबीयांचा कोरोना लसीकरणाचा खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देकोरोना लसीकरणाचा खर्च उचलण्याची बँकेची घोषणानेहमीच सरकारी नियमांचे पालन करण्यावर भरया माध्यमातून कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न

मुंबई : देशव्यापी कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी कोरोना लस घेण्यास जाताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. यातच आता खासगी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या HDFC बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (hdfc bank to bear corona vaccination costs of employees and family members)

एचडीएफसीने बँकेच्या एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कुटुंबीयांचा कोरोना लसीकरणाचा खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे. बँकेतर्फे आवश्यक असलेल्या दोन्ही डोसचा खर्च कर्मचार्‍यांना दिला जाणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एचडीएफसी बँकेने कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. 

IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' ५ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी; आवर्जुन लक्ष द्या

नेहमीच सरकारी नियमांचे पालन 

या उपक्रमाविषयी बोलतांना एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या कर्मचार्‍यांसाठी आणि कार्यालयातील तसेच शाखांमधील ग्राहकांसाठी कामाचे सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नेहमीच सरकारी नियमांचे पालन केले आहे. आमच्या या कर्मचार्‍यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोरोना लसीकरणाचा खर्च उचलणे म्हणजे आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

कर्मचाऱ्यांचे मानले आभार

आमच्यासाठी आमचे कर्मचारी हे आघाडीचे कर्मचारी आहेत. लॉकडाऊनमध्ये आमच्या बँकिंग सेवा या ग्राहकांसाठी सुरू होत्या. कर्मचार्‍यांचे याबाबत आम्ही आभारी आहोत. त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांसाठी कोरोनापासून संरक्षण देणे हे आम्ही यातून सुनिश्चित करत आहोत, असे यावेळी बँकेकडून सांगण्यात आले. तसेच शाखा आणि कार्यालयातील सुरक्षा निकषांचे पालन करण्या बरोबरच बँकेने कर्मचार्‍यांच्या व त्यांच्या कुटूंबीयांच्या मानसिक आरोग्याची काळजी ही ऑनलाइन उपक्रमांच्या माध्यमातून घेतली आहे.

दरम्यान, देशातील इतर प्रमुख उद्योग असलेल्या रिलायन्स, गोदरेज समूह, टाटा ग्रुप, महिंद्रा, मारुती सुझुकी, मेरिको, वेदांता, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय या कंपन्यांनीही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा करोना लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :कोरोनाची लसएचडीएफसी