Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC Bank Share Price: एचडीएफसी बनली २ कोटी क्रेडिट कार्ड वाली पहिली बँक, शेअरमध्ये पुन्हा तेजी

HDFC Bank Share Price: एचडीएफसी बनली २ कोटी क्रेडिट कार्ड वाली पहिली बँक, शेअरमध्ये पुन्हा तेजी

खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी ही २ कोटी क्रेडिट कार्ड वाली देशातील पहिली बँक बनली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:27 AM2024-01-24T11:27:50+5:302024-01-24T11:27:59+5:30

खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी ही २ कोटी क्रेडिट कार्ड वाली देशातील पहिली बँक बनली आहे.

HDFC Bank Became the first bank with 2 crore credit cards share boomed again | HDFC Bank Share Price: एचडीएफसी बनली २ कोटी क्रेडिट कार्ड वाली पहिली बँक, शेअरमध्ये पुन्हा तेजी

HDFC Bank Share Price: एचडीएफसी बनली २ कोटी क्रेडिट कार्ड वाली पहिली बँक, शेअरमध्ये पुन्हा तेजी

खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी ही २ कोटी क्रेडिट कार्ड वाली देशातील पहिली बँक बनली आहे. त्याचा परिणाम बुधवारी बँकेच्या शेअर्सवरही दिसून आला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. रेड झोनमध्ये उघडल्यानंतर इंट्रा-डेमध्ये बँकेच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांनी वाढ झाली. बँकेचे शेअर्स बीएसईवर १.३० टक्क्यांच्या वाढीसह १४४६.२० रुपयांवर ट्रेड करत होते. इंट्रा-डे मध्ये तो १४४८.८५ रुपयांवर पोहोचला होता आणि एका ट्रेडिंग दिवसापूर्वी शेअर १४२७.६० रुपयांवर (HDFC Bank Share Price) बंद झाला होता.

HDFC बँकेनं २००२ मध्ये क्रेडिट कार्ड व्यवसाय सुरू केला आणि २००१ मध्ये पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केलं. २०१७ मध्ये त्यांनी १ कोटींची सीआयएफ लेव्हल ओलांडली. यानंतर, बरोबर ६ वर्षे आणि १ महिन्यात बँकेनं २ कोटींची सीआयएफ लेव्हल ओलांडली. कंपनीनं २३ जानेवारी रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सर्वात मोठी कार्ड इश्यूअर

एचडीएफसी बँकेनं २००१ मध्ये पहिलं क्रेडिट कार्ड जारी केलं. मार्च २०२३ च्या आकडेवारीनुसार, त्यांच्याकडे क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि त्याचा २८.६ टक्के मार्केट शेअर आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, बँकेनं नोव्हेंबरमध्ये ३.२ लाख कार्ड जोडले होते आणि त्यांच्या आऊटस्टँडिंग कार्डांची संख्या १.९५ कोटींवर पोहोचली होती. आता हा आकडा २ कोटींवर पोहोचल्याचं एचडीएफसी बँकेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे. बँकेची मंथली कार्ड स्पेडिंग रेंज ३५ हजार ते ४५ हजार रुपये आहे. डिसेंबर २०२३ च्या आकडेवारीनुसार कंझ्युमर ड्युरेबल लोन आणि क्रेडिट कार्डासह पेमेंट बिझनेसच्या रिटेल असेट्समध्ये ८ टक्के हिस्सा आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणुक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: HDFC Bank Became the first bank with 2 crore credit cards share boomed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.