Join us

HDFC Bank च्या मर्जरनंतर टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 6:09 PM

मर्जरनंतर बँकेला आपला मॉर्गेज व्यवसाय वाढवायचा आहे, त्यासाठी आवश्यक बदल करण्यात आला आहेत.

HDFC Bank :  HDFC बँकेचे जुलैमध्ये हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) मध्ये विलीनीकरण झाले. एचडीएफसीबँक लिमिटेडने मर्जरनंतर टॉप मॅनेजमेंटमध्ये काही बदल केले आहेत. बँकेने रविवारी रात्री उशिरा कर्मचार्‍यांना मेमोद्वारे बदलांची तपशीलवार माहिती दिली. दरम्यान, मर्जरनंतर आता बँकेला आपला मॉर्गेज व्यवसाय वाढवायचा आहे, त्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

हे बदल करण्यात आले रिपोर्ट्सनुसार, या बदलाचा एक भाग म्हणून रमेश लक्ष्मीनारायणन यांच्या नेतृत्वाखालील इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि डिजीटल फंक्शनची जबाबदारी सीईओ शशिधर जगदीसन यांच्या अंतर्गत आणण्यात आली आहे. बँक आपल्या शाखांमध्ये अधिक प्रोडक्ट आणि सर्व्हिस देण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. याशिवाय 2009 पासून ट्रेडरीचे नेतृत्व करणाऱ्या आशिष पार्थसारथी यांच्याकडे प्रमुख रिटेल शाखेच्या व्यवसायाची जबाबदारी मिळणार आहे.

04 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अपडेट केलेपार्थसारथी यांच्या नेतृत्वाखाली बँक रिटेल ब्रांच बिझनेसला भौगोलिक आधारावर विभागत आहे. याचे सहनेतृत्व स्मिता भगत आणि संपत कुमार करणार आहेत. स्मिता भगत बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्या पूर्वी सरकार आणि संस्थात्मक व्यवसाय, इकोसिस्टम बँकिंग, सर्वसमावेशक बँकिंग आणि स्टार्ट-अपच्या गट प्रमुख होत्या. तर, संपत कुमार हे बँकेतील लायबिलीट प्रोडक्ट, थर्ड पार्टी प्रोडक्ट आणि नॉन-रेजिडेंड बिझनेस ग्रुपचे प्रमुख होते.

रिटेल शाखेच्या व्यवसायाचे प्रमुख असलेले अरविंद वोहरा आता बँकेच्या रिटेल असेटची जबाबदारी सांभाळतील. तर, मॉर्गेजची जबाबदारी अरविंद कपिल यांच्याकडे देण्यात आली आहे. पेमेंट्स, कन्झ्युमर फायनान्स आणि डिजिटल बँकिंगचे नेतृत्व करणारे पराग राव आता प्रोडक्ट लायबिलीटीज आणि मार्केटिंगसह मॅनेजमेंटचे नेतृत्व करतील. राकेश सिंग गुंतवणूक आणि खाजगी बँकिंगच्या कामासह ऑफशोअर आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी अतिरिक्त जबाबदारी सांभाळतील.

शेअर्स दबावाखाली जुलैमध्ये हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पच्या अधिग्रहणानंतर बँकेच्या शेअर्सवर दबाव आला आहे. विलीनीकरणानंतर ही जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बनली आहे. गेल्या महिन्यात ब्रोकरेज हाऊस नोमुराने एचडीएफसी बँकेचे रेटिंग कमी केले होते. ब्रोकरेजने रेटिंग बाय वरून न्यूट्रल पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :एचडीएफसीव्यवसायबँकिंग क्षेत्रबँक