Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC Bank : HDFC बँक विशेष FD वर बंपर व्याज देणार, ५५ महिन्यांच्या गुंतवणुकीवर मजबूत परतावा

HDFC Bank : HDFC बँक विशेष FD वर बंपर व्याज देणार, ५५ महिन्यांच्या गुंतवणुकीवर मजबूत परतावा

एचडीएफसी बँकेने दोन स्पेशल डिपॉझिट स्किम सुरू केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 09:17 AM2023-06-12T09:17:38+5:302023-06-12T09:18:00+5:30

एचडीएफसी बँकेने दोन स्पेशल डिपॉझिट स्किम सुरू केल्या आहेत.

HDFC Bank : HDFC Bank offers bumper interest on special FDs, strong returns on 55 months investment | HDFC Bank : HDFC बँक विशेष FD वर बंपर व्याज देणार, ५५ महिन्यांच्या गुंतवणुकीवर मजबूत परतावा

HDFC Bank : HDFC बँक विशेष FD वर बंपर व्याज देणार, ५५ महिन्यांच्या गुंतवणुकीवर मजबूत परतावा

देशातील सर्वात मोठी प्राइव्हेट बँकएचडीएफसीबँकेने काही दिवसापूर्वी दोन स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्किम सुरू केली. बँकेने ३५ महिने आणि ५५ महिन्यांच्या कालावधीसाठी दोन FD योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये २९ मे २०२३ पासून गुंतवणूक सुरू झाली आहे. या दोन्ही कालावधीच्या मुदत ठेवींवर बँक सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. तथापि, ही FD योजना मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुली आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ३५ महिने किंवा २ वर्षे ११ महिन्यांच्या कालावधीसह विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ७.२० टक्के दराने व्याज मिळेल. बँक ५५ महिने किंवा ४ वर्षे आणि ७ महिन्यांच्या कालावधीसह विशेष एफडीवर ७.२५ टक्के दराने व्याज देत आहे. एचडीएफसी बँक त्यांच्या इतर मुदत ठेवींवर तीन टक्के ते ७.२५ टक्के व्याज देत आहे. बँक ४ वर्षे, ७ महिने ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज दर देत आहे. 

सध्याचे व्याज दर २९ मे २०२३ पासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू आहेत. काही काळापूर्वी HDFC बँकेने एक वर्ष १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD चे व्याजदर बदलून ते ६.६ टक्के केले आहेत. एचडीएफसी बँक नियमित नागरिकांसाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवींवर ३% ते ७.१०% दर देते. एचडीएफसी बँक वर्षातील वास्तविक दिवसांच्या आधारे व्याज मोजते. ठेव लीप आणि नॉन-लीप वर्षात असल्यास, व्याज दिवसांच्या संख्येवर आधारित मोजले जाते. म्हणजेच लीप वर्षात ३६६ दिवस आणि नॉन लीप वर्षात ३६५ दिवस असतात.

Read in English

Web Title: HDFC Bank : HDFC Bank offers bumper interest on special FDs, strong returns on 55 months investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.