Join us

मोठा झटका! HDFC आणि Canara बँकेकडून कर्जदरात वाढ, होमलोन-कारलोनचा EMI वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 11:53 AM

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या HDFC बँकेनं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होण्याआधीच आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेनं MCLR (कर्जदर) ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे.

मुंबई-

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या HDFC बँकेनं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होण्याआधीच आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेनं MCLR (कर्जदर) ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे. ७ जून २०२२ पासून नवीन कर्जदर लागू झाला असल्याचं बँकेकडून जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे कर्जदारांच्या हफ्त्यात आता वाढ होणार आहे. तसंच गृहकर्ज, वाहन कर्ज तसंच वैयक्तिक कर्ज देखील महागणार आहे. 

बँकेनं संकेतस्थळावर जाहीर केलेल्या नव्या दरानुसार एमसीएलआर ७.१५ टक्क्यांवरुन वाढून आता ७.५० टक्के इतका झाला आहे. तर एक महिन्यासाठीचा एमसीएलआर वाढून ७.५५ टक्के आणि तीन महिन्यांसाठी ७.६० टक्के इतका झाला आहे. एचडीएफसी बँकेसोबतच कॅनरा आणि करूर वैश्य बँकेनं देखील कर्जदरात वाढ केली आहे. 

आठवडाभरात दुसऱ्यांदा वाढHDFC बँकेनं एका आठवड्यात दुसऱ्यांदा कर्जदरात वाढ केली आहे. याआधी बँकेनं १ जून २०२२ रोजी गृहकर्जाच्या रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये ५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. MCLR मध्ये वाढ झाल्याचा परिणाम प्रत्येक प्रकराच्या कर्जावर पाहायला मिळतो. एमसीएलआर वाढल्यामुळे होम, ऑटो आणि इतर सर्व प्रकराच्या कर्जदरात वाढ होते. 

Canara बँकेचंही कर्ज महागलंसार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनं एका वर्षाच्या मुदतीतील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) ०.०५ टक्के वाढ करून ७.४० टक्के इतका कर्जदर केला आहे. बँकेनं सहा महिन्याच्या मुदतीसाठीच्या एमसीएलआरमध्येही वाढ करत ७.३० टक्क्यावरुन ७.३५ टक्के इतका केला आहे. कॅनरा बँकेचे नवे कर्जदर देखील आजपासून लागू झाले आहेत. 

टॅग्स :एचडीएफसीभारतीय रिझर्व्ह बँक