नवी दिल्ली : आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या बचतीच्या पैशावर चांगला परतावा मिळावा अशी इच्छा असते. विशेष म्हणजे, आज बरेच लोक आपले पैसे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवण्यास प्राधान्य देतात. गुंतवणुकीच्या या क्षेत्रांमध्ये चांगला परतावा मिळण्याची जास्त क्षमता आहे, परंतु येथे बाजारातील जोखीमही तितकीच जास्त आहे. त्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतात.
अशा परिस्थितीत देशातील बहुतेक लोक बँकांच्या मुदत ठेव योजनेत (FD) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासमोर मुदत ठेव योजनेचा सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. शिवाय परतावाही चांगला असतो.
काही दिवसांपूर्वी HDFC ने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील व्याजदर 2 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहेत. सत्यामुळे सध्या ही बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मॅच्युरिटी बकेटवर 4.50 ते 7 टक्के व्याजदर देत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 5 टक्के ते 7.75 टक्के इतका आहे. या बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीच्या व्याजदरातही वाढ केली आहे.
सध्या ही बँक 90 दिवस ते 6 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. तर, 6 महिने आणि 1 दिवस ते 9 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.50 टक्के व्याजदर मिळत आहे. याबाबत बँकेने अशी माहिती दिली आहे की 9 महिने आणि 1 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवर 6.65 टक्के व्याजदर मिळत आहे. याशिवाय, एक वर्ष ते 15 महिन्यांत मुदत ठेव योजनेवर 7 टक्के व्याजदर दिले जात आहे.