Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC ने गुंतवणूकदारांसाठी आणली नवी FD; व्याजदर मिळणार मजबूत, वाचा सविस्तर

HDFC ने गुंतवणूकदारांसाठी आणली नवी FD; व्याजदर मिळणार मजबूत, वाचा सविस्तर

HDFC बँकेने दोन नवीन FD योजना सुरू केल्या आहेत. या योजना मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुल्या असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:31 AM2023-05-30T08:31:46+5:302023-05-30T08:40:20+5:30

HDFC बँकेने दोन नवीन FD योजना सुरू केल्या आहेत. या योजना मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुल्या असतील.

hdfc bank launches special fixed deposit rates check these tenures to get higher interest rate | HDFC ने गुंतवणूकदारांसाठी आणली नवी FD; व्याजदर मिळणार मजबूत, वाचा सविस्तर

HDFC ने गुंतवणूकदारांसाठी आणली नवी FD; व्याजदर मिळणार मजबूत, वाचा सविस्तर

HDFC आता ग्राहकांसाठी नवी एफडी सुरु केली आहे. बँकेने मर्यादित कालावधीसाठी दोन विशेष मुदत ठेवी योजना सुरू केल्या आहेत. बँकेच्या वेबसाइटवर या योजनेची माहिती देण्यात आली आहे. नवीन मुदत ठेव योजना २९ मे २०२३ पासून सुरू झाली आहे. बँकेने ३५ महिने आणि ५५ महिन्यांच्या दोन एफडी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.२५ टक्के दराने व्याज दिले जाईल. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांनी या FD योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. या FD योजना मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुल्या आहेत.

३५ महिने किंवा २ वर्षे ११ महिन्यांच्या कालावधीसह विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ७.२० टक्के दराने व्याज मिळेल. बँक ५५ महिने किंवा ४ वर्षे आणि ७ महिन्यांच्या कालावधीसह विशेष एफडीवर ७.२५ टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेने एक वर्ष १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीचे व्याजदर बदलून ते ६.६ टक्के केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.१ टक्के करण्यात आला आहे.

‘रोल्स रॉयस’विरोधात सीबीआयकडून गुन्हे, ॲडव्हान्स्ड जेट ट्रेनर खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप

२१ महिने ते २ वर्षांसाठी व्याजदर सात टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.५ टक्के करण्यात आला आहे. एचडीएफसी बँक नियमित नागरिकांसाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवींवर ३% ते ७.१०% दर देते. १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कमाल व्याजदर दिला जातो.

एचडीएफसी बँक वर्षातील वास्तविक दिवसांच्या आधारे व्याज मोजते. ठेव लीप आणि नॉन-लीप वर्षात असल्यास, व्याज दिवसांच्या संख्येवर आधारित मोजले जाते. म्हणजेच लीप वर्षात ३६६ दिवस आणि नॉन लीप वर्षात ३६५ दिवस असतात. गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केली होती. यानंतर बँकांनीही त्यांच्या एफडी योजना आकर्षक करण्यासाठी व्याजदरात वाढ केली. यासोबतच बँकांनी नवीन मुदत ठेव योजनाही सुरू केल्या आहेत.

Web Title: hdfc bank launches special fixed deposit rates check these tenures to get higher interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.