मुंबई: खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या HDFC Bank ने चौथ्या तिमाहीत जबरदस्त कमाई केली असून, या कालावधीत बँकेला तब्बल ८ हजार ४३४ कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती मिळाली आहे. HDFC Bank चा निव्वळ नफा १५.८ टक्क्यांनी वाढल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. (hdfc bank q4 2021 results net profit up 16 percent at rupees 8434 crore)
HDFC Bank कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेचा एकात्मिक निव्वळ नफा १६.८ टक्क्यांनी वाढून ३१ हजार ८३३ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेचे एकत्रित उत्पन्न वाढून ४० हजार ९०९.४९ कोटी रुपये झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत बँकेचे उत्पन्न ३८ हजार २८७.१७ कोटी रुपये होते, असे बँकेकडून सांगण्यात आले.
कोरोच्या काळातही Mutual Funds मध्ये विक्रमी गुंतवणूक; तब्बल ४१ टक्क्यांची वाढ
एकत्रित उत्पन्न वाढले
एचडीएफसी बँकेने नियामक सूचनेमध्ये सदर माहिती दिली आहे. ३१ मार्च २०२० रोजी बँकेची एकूण आगाऊ रक्कम १०,४३,६७१ कोटी रुपयांवरून १३.६ टक्क्यांनी वाढली असून, ३१ मार्च २०२१ पर्यंत ११,८५,२८४ कोटी रुपये झाली आहे, असेही बँकेने सांगितले.३१ मार्च २०२१ रोजी एकूण NPA एकूण कर्जाच्या १.३२ टक्के असून, ही आकडेवारी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे म्हटले जात आहे.
LIC कर्मचाऱ्यांना दुप्पट लाभ; २५ टक्के पगारवाढ, ५ दिवसांचा आठवडा आणि...
HDFC Bank चा NPA
गतवर्षी बँकेचा एनपीए १.२६ टक्के एवढा होता. तर, निव्वळ एनपीए ०.४० टक्के होता. पुनरावलोकनाच्या तिमाहीत कर्ज आणि आपत्कालीन गरजांसाठी बँकेने ४ हजार ६९३.७० कोटी रुपयांची तरतूद केली.