नवी दिल्ली - एचडीएफसीबँकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. बँकेने ग्राहकांना ई-मेल करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेच्या ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणजेच बँकेची सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहणार आहे. डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुधारण्यासाठी बँक मेंटेनन्सचे काम करणार आहे. एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या सेवा 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 ते 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत प्रभावित होतील.
एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना "प्रिय ग्राहक, एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सतत प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही नियोजित देखभाल करत आहोत. या उपक्रमादरम्यान कर्जाशी संबंधित सेवा प्रभावित होतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या महिन्यात पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहणार आहे.
Bank Holiday : लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार; आजचं करा कामं #Bank#BankHolidayhttps://t.co/sYOI2U7rZ0
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2021
पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी
आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या यादीनुसार, ऑगस्ट 2021 साठी 15 सुट्ट्या देण्यात आल्या. यात दोन रविवार आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.येत्या काळात बँका कधी आणि कुठे बंद राहतील याची माहिती जाणून घेऊया. जेणेकरून वेगवेगळ्या शहरांमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (RBI Bank Holiday List) पाहून तुम्ही तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील याची माहिती घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करू शकता. 28 ऑगस्ट हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय 29 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; 'हा' Video केला शेअर#SBI#Bankhttps://t.co/aFnmFuSHp1
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2021
SBI नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करता? मग करा 'हे' मोठं काम अन्यथा खात्यातून गायब होतील पैसे
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांना एक महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. जर तुम्ही देखील नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीमुळे ग्राहकांचं मोठं नुकसान होत आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा नेट बँकिंग पासवर्ड बदलून अशी फसवणूक टाळू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये स्ट्रॉन्ग आणि अनब्रेकेबल पासवर्ड तयार करण्याचे 8 मार्ग सांगितले आहेत.
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता गुड न्यूज; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज?#Jobs#JOBAlert#bankhttps://t.co/8JcTuEKkyp
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2021