Join us  

देशातील सर्वात श्रीमंत बँकरला मिळाला एक रुपया पगार! 'या' बँकेत दोन अधिकाऱ्यांना सर्वाधिक पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 1:38 PM

उदय कोटक हे देशातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत. कोटक महिंद्रा बँकेत त्यांना २६ टक्के हिस्सेदारी मिळाली आहे.

आपल्या देशात अनेक मोठ्या बँका आहेत. या बँकेत सर्वात जास्त पगार मिळवणारे बँकर कोण आहेत तुम्हाला माहित आहे का? देशात सर्वात जास्त पगार घेणारे एचडीएफसी बँकेचे शशिधर जगदीशन यांना आहे. २०२२-२३ या वर्षातील सर्वात जास्त पगार घेणारे बँकर ठरले आहेत. या दरम्यान, त्यांना बँकेने १०.५५ कोटी  रुपये पगार मिळाला आहे. यामध्ये मूळ वेतन २.८२ कोटी, ३.३१ कोटी भत्ते, ३३.९२ लाख रुपयांचा पीएफ आणि ३.६४ कोटी रुपयांचा परफॉर्मन्स बोनस यांचा समावेश आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, जगदीशनचे सहकारी आणि एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांना गेल्या आर्थिक वर्षात १० कोटी रुपये दिले होते, यामुळे ते कदाचित देशातील दुसरे सर्वात जास्त पैसे देणारे बँकर बनले आहेत.

तुमचा EPF टॅक्स फ्री नाही, जमा होणाऱ्या पैशांच्या कोणत्या भागावर लागतो Tax; जाणून घ्या

बँकांच्या सीईओमध्ये अॅक्सिस बँकमध्ये अमिताभ चौधरी यांना ९.७५ कोटी रुपये मिळाले आहेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. यांच्यानंतर आयसीआयसीआयसीआय बँकेते संदीप बख्शी यांना ९.६० कोटी रुपये मिळाले आहेत. 

कोटक महिंद्रा बँकेत सुमारे २६ टक्के हिस्सेदारी असलेल्या उदय कोटक यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तसेच कोविड-19 साथीच्या आजारापासून एक रुपयाचा टोकन पगार मोबदला म्हणून घेण्याचा निर्णय सुरू ठेवला. बँकिंग क्षेत्र नोकऱ्या कमी होण्याच्या समस्येने ग्रासलेले असताना, कोटक महिंद्रा बँक मोबदला वाढवण्यासाठी पुढे आली आणि व्यवस्थापकीय कर्मचारी वगळून कर्मचार्‍यांच्या सरासरी मोबदल्यात १६.९७ टक्क्यांनी वाढ केली.

आयसीआयसीआय बँकेतील कर्मचाऱ्यांची ११ टक्क्यांनी पगारवाढ झाली आहे. अॅक्सिस बँकेतील कर्मचाऱ्यांना ७.६ टक्के पगारवाढ झाली.  तर फेडरल बँकेत २.६७ टक्के वाढ झाली आहे, या बँकेत नोकरी सोडण्याऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. 

टॅग्स :एचडीएफसीबँक