HDFC Bank Hikes Interest Rates: देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीनं (HDFC) आपल्या ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर महाग केले आहेत. 7 सप्टेंबरपासून, बँक ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या काही निवडक कर्जांवर अधिक व्याज द्यावे लागेल. एचडीएफसी बँकेनं बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. हे वाढलेले दर 7 सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत, म्हणजेच आता ग्राहकांच्या खिशावर ईएमआयचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. आता ग्राहकांना एचडीएफसी होम लोन, कार लोन, पर्सनल लोन इत्यादींसाठी अधिक प्रमाणात खिसा रिकामा करावा लागेल.
एचडीएफसी बँकेच्या ओव्हरनाइट एमएलसीआरमध्ये 15 bps च्या वाढीनंतर, तो 8.35 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एका महिन्याचा एमएलसीआर 0.10 टक्क्यांनी वाढला असून तो 8.45 टक्क्यांवरून 8.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. तीन महिन्यांचा एमएलसीआर 10 बेसिस पॉईंट्सनं वाढला असून तो 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्क्यांवर पोहोचलाय. सहा महिन्यांचा एमएलसीआर 10 बेसिस पॉईंट्सनं वाढला आहे आणि तो 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्क्यांवर आलाय.
तुमचा एमएलसीआर किती वाढलाएका वर्षाच्या MCLR शी जोडलेल्या अनेक कन्झ्युमर लोनसाठी एमएलसीआर 5 बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आलाय. तो 9.10 टक्क्यांवरून 9.15 टक्के झाला आहे. याशिवाय, बँकेनं एक वर्ष आणि दोन वर्षांसाठी एमएलसीआर 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे आणि तो 9.20 टक्क्यांवरून 9.25 टक्के झालाय.
एमएलसीआर वाढवल्यावर इएमआय का वाढतोमार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं लाँच केला होता. एमएलसीआर आता क्रेडिट आणि होमलोन देण्यासाठी बँकांचा अंतर्गत बेंचमार्क म्हणून लागू आहे, ज्याला फ्लोटिंग व्याज दर व्यवस्था देखील म्हटलं जाऊ शकतं. एमएलसीआर थेट घर खरेदीदारांनी घेतलेल्या गृहकर्ज ईएमआयशी जोडलेले आहे. त्यामुळे एमसीएलआर वाढल्यानं बँकांची कर्जे महाग होतात.