Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC: इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार, एचडीएफसी बँकेत १ जुलै रोजी ‘एचडीएफसी’ हाेणार विलीन

HDFC: इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार, एचडीएफसी बँकेत १ जुलै रोजी ‘एचडीएफसी’ हाेणार विलीन

HDFC to merge with HDFC Bank: गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:56 AM2023-06-28T06:56:14+5:302023-06-28T06:56:35+5:30

HDFC to merge with HDFC Bank: गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते.

HDFC: Biggest deal in history, HDFC to merge with HDFC Bank on July 1 | HDFC: इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार, एचडीएफसी बँकेत १ जुलै रोजी ‘एचडीएफसी’ हाेणार विलीन

HDFC: इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार, एचडीएफसी बँकेत १ जुलै रोजी ‘एचडीएफसी’ हाेणार विलीन

मुंबई : गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते.

एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या विलीनीकरणास मंजुरी देण्यासाठी एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांच्या संचालक मंडळांची एक बैठक ३० जून रोजी होत आहे. त्यानंतर १ जुलैपासून विलीनीकरणाची अंमलबजावणी होईल. कंपनीच्या समभागांची सूचीबद्धता समाप्त करण्याचे काम १३ जुलैपासून अंमलात येईल.

ग्राहकांवर काय परिणाम?
या विलीनीकरणानंतर बँकेच्या भांडवलात पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होणार आहे. बँक पूर्वीपेक्षा अधिक जोखमीचे कर्ज देऊ शकणार आहे. यासोबतच सध्या एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या सेवा घेण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या शाखांमध्ये जावे लागत होते, मात्र आता एकाच शाखेत जाऊन तुमचे काम होणार आहे.

पारेख पायउतार हाेणार...
एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी आपण ३० जून रोजी पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे.

४ एप्रिल २०२२ एचडीएफसी लि.चे ​​एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
४० अब्ज डॉलर
हा सौदा आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार होईल. 
१८ लाख कोटी 
नव्या कंपनीची  संपत्ती  असेल.
२५ शेअरच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे ४२ समभाग समभागधारकांना  मिळतील.

Web Title: HDFC: Biggest deal in history, HDFC to merge with HDFC Bank on July 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.