आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. बँकेनं परवाना शुल्क भरण्यासाठी आणि 5G स्पेक्ट्रमच्या देयकाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे. हे कर्ज दोन वर्षांसाठी असून ते सप्टेंबरच्या मध्यात टेलिकॉम कंपनीला देण्यात आलं होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, हे कर्ज कंपनीच्या काही कर्ज आणि स्टॅटुअरी पेमेंट कमिटेमेंटच्या अंतिम मुदतीपूर्वी मिळालं होतं. कंपनीनं यापूर्वीच आर्थिक वर्ष 2022 आणि आर्थिक वर्ष 2023 साठी परवाना शुल्क म्हणून 350 कोटींहून अधिक आणि स्पेक्ट्रम युजेज शुल्क (SUC) म्हणून सुमारे 1,700 कोटी रुपये भरले आहेत. कंपनी आता इक्विटी फंडिंगसाठी गुंतवणूकदारांशी बोलणी करत आहे.प्रमोटर ग्रुपकडून 2000 कोटींचा भरवसाव्होडाफोन आयडियाच्या प्रमोटर ग्रुप कंपनीनं व्हिआयला 2 हजार कोटी रुपयांचे आश्वासन दिलं आहे. प्रवर्तक समूह कंपनीनं व्होडाफोन आयडियाला सांगितले की पेमेंट दायित्वे हाताळण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास ती 2000 कोटी रुपयांची मदत देण्यास तयार आहे. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियानं 14 ऑगस्ट रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये याचा खुलासा केला होता.
प्रवर्तक अतिरिक्त 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहेत. ही गुंतवणूक बाह्य गुंतवणुकीव्यतिरिक्त असेल आणि मार्च अखेरपर्यंत स्पेक्ट्रमची थकबाकी भरण्यास मदत होईल, असं कंपनीचे सीईओ अक्षय मुंद्रा म्हणाले होते. या तिमाहीत इक्विटी गुंतवणुकीबाबत बोलणी पूर्ण केली जातील त्यांनी म्हटलं.