Join us

HDFC Loan : HDFC चा ग्राहकांना झटका, MLCR वाढवला; कर्जाचे हप्ते महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 3:36 PM

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेनं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 15 बेस पॉईंट्स पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. हे नवीन दर 7 जून 2023 पासून लागू होतील. हे दर वाढवल्यानंतर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे. बँकेनं वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्जदरात 5 ते 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता ग्राहकांसाठी कार लोन आणि पर्सनल लोनचे ईएमआय वाढणार आहे.

बँकेचा ओव्हरनाईट एमएलसीआर आता 8.10 टक्के आहे. तर एका महिन्याचा एमएलसीआर 8.20 टक्के करण्यात आला आलाय, तीन महिन्यांचा एमएलसीआर आता 8.50 टक्के झाला आहे. तर दुसरीकडे लेंडर्सचा सहा महिन्यांचा एमएलसीआर आता 8.85 टक्के आहे. याशिवाय, दोन वर्षांचा एमएलसीआर 9.05 टक्के आणि तीन वर्षांचा एमएलसीआर 9.10 टक्के करण्यात आला आहे.

एचडीएफसी बँकेचा एक वर्षाचा एमएलसीआर 9.05 टक्के, दोन आणि तीन वर्षांचा एमएलसीआर 9.10 टक्के आणि 9.20 टक्क्यांवर गेला आहे. एमएलसीआर रेट हा एक बेसिक रेट असतो ज्यावर बँका कर्ज देण्याचे काम करतात. एचडीएफसी बँकेच्या वाढलेल्या एमसीएलआरचा गृहकर्ज घेणार्‍यांवर परिणाम होणार नाही. हे दर केवळ पर्सनल लोन, ऑटो लोन आणि एमएलसीआरशी जोडलेल्या इतर कर्जाच्या जुन्या कर्जदारांसाठी लागू होतील.

टॅग्स :एचडीएफसी