Join us

HDFC Bank Share : '₹२००० पर्यंत पोहोचणार HDFC चा शेअर', एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, "खरेदी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:46 AM

सध्या शेअर बाजारानं आजवरचा उच्चांकी स्तर गाठला आहे. त्यात आता येत्या काही दिवसांत HDFC बँकेचे शेअर्स 2000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

HDFC Bank Share : सध्या शेअर बाजारानं आजवरचा उच्चांकी स्तर गाठला आहे. त्यात आता येत्या काही दिवसांत HDFC बँकेचे शेअर्स 2000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरनं एचडीएफसी शेअरची टार्गेट प्राईज 2000 रुपये निश्चित केली आहे, तसंच त्यांनी खरेदी करण्याची शिफारस केलीये. याचा अर्थ हा स्टॉक काही दिवसात 30 टक्क्यांहून अधिक नफा देऊ शकतो. सध्या या शेअरची किंमती 1534.95 रुपयांवर आहे. 

यापूर्वी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनंदेखील हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देताना 1950 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली होती. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्यात मोठी घसरण झाली होती. वर्षभरात 1757.50 रुपयांवर पोहोचलेला शेअर 1363.55 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. आता गेल्या काही आठवड्यांत त्यात पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. एका महिन्यात त्यात 7.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, 2024 मध्ये त्यात सुमारे 10 टक्क्यांची घसरण झालीये. 

शेअर बाजाराच्या 39 एक्सपर्टपैकी 21 जणांनी यासाठी स्टाँग बायची शिफारस केली आहे. तर दुसरीकडे 14 जणांनी बाय रेटिंग दिलंय. याशिवाय 4 जणांनी होल्ड करण्याचा सल्ला दिलाय. या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला कोणीही दिलेला नाही. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एचडीएफसीशेअर बाजारगुंतवणूक