मुंबई : बँकेचा खाते क्रमांक, पासवर्ड आदीशिवाय केवळ स्मार्टफोनच्या आधारे बँक व्यवहार करणाऱ्या अत्याधुनिक ‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) प्रणालीचा वापर आता ‘चिल्लर’ हे फंड ट्रान्सफर अॅप करणार आहे. एचडीएफसी बँकेने त्यांचे युपीआय त्यांच्या बँक अॅपसोबतच ‘चिल्लर’लाही उपलब्ध करून दिले आहे.
या संयुक्त उपक्रमाचा शुभारंभ एचडीएफसीच्या डिजिटल बँकिंगचे राष्ट्रीय प्रमुख नितीन चुग आणि चिल्लरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनी जॉय यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत करण्यात आला. फेब्रुवारी २०१५ मध्ये बाजारात आलेल्या ‘चिल्लर’ या स्टार्टअप कंपनीच्या अॅपद्वारे यापूर्वीही विविध बँक खात्यांत झटपट पैसे वळते करता येत होते. मात्र त्यासाठी ११ बँकांसोबतच्या आयएमपीएस प्रणालीचा वापर करण्यात येत होता. आता एचडीएफसीच्या ‘यूपीआय’मुळे ‘चिल्लर’ आणखी ३६ बँकांना सेवा देऊ शकणार आहे. तसेच सेवेची गुणवत्ता आणि वेग वाढण्यासही त्याचा उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)
>‘यूपीआय’ म्हणजे काय?
या प्रणालीचा वापर करून स्मार्टफोनद्वारे ग्राहकाच्या कोणत्याही बँकेच्या खात्यात क्षणार्धात पैसे वळते करता येतात.त्यासाठी वारंवार युजर आयडी/पासवर्ड टाकावा लागत नाही. तसेच ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे खाते कोणत्या बँकेत आहे, खाते क्रमांक आदी काहीही माहीत असणे गरजेचे नसते. त्याच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे एका क्लिकवर ही कार्यवाही करता येते.
एचडीएफसीचे ‘यूपीआय’ आता ‘चिल्लर’ अॅपवर!
स्मार्टफोनच्या आधारे बँक व्यवहार करणाऱ्या अत्याधुनिक ‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) प्रणालीचा वापर आता ‘चिल्लर’ हे फंड ट्रान्सफर अॅप करणार आहे.
By admin | Published: April 7, 2017 11:52 PM2017-04-07T23:52:14+5:302017-04-07T23:52:14+5:30