मेहनत आणि जिद्द असेल तर यशाचं शिखर गाठणं कठीण नाही. कधीकाळी ३० रुपये रोजंदारीवर काम करणारी व्यक्ती सुद्धा १७ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या साम्राज्याचा मालक होऊ शकते, असं जर कोणाला सांगतलं तर त्या व्यक्तीला सुरूवातीला कदाचित खरंही वाटणार नाही. पण हे सत्य आहे आणि त्या व्यक्तीला पंजाबचा अंबानी असं म्हटलं जातं. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून राजिंदर गुप्ता आहेत. ते देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत.
राजिंदर गुप्ता हे ट्रायडंट ग्रुपचे अध्यक्ष आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १२,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राजिंदर गुप्ता हे पंजाबमधील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. राजिंदर गुप्ता यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी २००७ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
या पदांवर आहेत कार्यरत
या सर्वांशिवाय चंदीगड येथील पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती झाली. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशच्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. गुप्ता हे पंजाब ब्युरो ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशनच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये व्यापार, उद्योग आणि वाणिज्यचे प्रतिनिधी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी नववी नंतर शिक्षण घेतलेलं नाही. त्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे दिवसाला ३० रुपये पगारावर काम करावं लागलं.
उभारलं मोठं साम्राज्य
गुप्ता यांनी सिमेंटचे पाईप आणि मेणबत्त्या बनवत आपल्या कामाची सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांना दिवसाला ३० रुपये मिळत होते. कालांतरानं १९८० मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि १९८५ मध्ये अभिषेक इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये जॉईंट व्हेन्चरमध्ये सूतगिरणी सुरू केली, त्यातून त्यांची भरघोस कमाई झाली.
त्यानंतर गुप्ता यांनी पंजाब आणि मध्य प्रदेशात त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे कपडे, कागद आणि केमिकल सेक्टरमधील एक ग्लोबल लीडरमध्ये रुपांतर केलं. आता गुप्ता यांच्या ट्रायडेंट ग्रुपच्या ग्राहकांमध्ये वॉलमार्ट, जेसीपेनी, लक्झरी आणि लिनन यांचा समावेश आहे. दरम्यान, आरोग्याच्या कारणास्तव २०२२ मध्ये त्यांनी ट्रायडेंटच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु ते समूहाचे चेअरमन एमेरिट्स म्हणून कार्यरत आहेत.