Join us

क्रेडिट कार्ड वापरून 'त्याने' २५ लाखांचा प्रवास मोफत केला; 'असा' होतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:10 PM

गॅजेट खरेदी, ई कॉमर्स साईटवर शॉपिंग, मूव्ही पाहणे आणि बाहेर जेवणे यासाठी कॅशबॅक आणि व्हाउचरसह अन्य सुविधांचा क्रेडिट कार्डधारक फायदा घेऊ शकतात

जर तुम्हालाही फिरण्याची आवड असेल आणि तुमच्याकडे बजेट नसेल तर आता चिंता नको, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून २५ लाख रुपयांपर्यंत मोफत प्रवासाचा फायदा तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही तुमचा सर्व खर्च पूर्ण करू शकता. तुम्हाला विनाखर्च फ्लाईट तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याच्या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. 

तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे मोफत पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वाधिक क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. एका व्यक्तीने क्रेडिट कार्डद्वारे २५ लाखांपर्यंत मोफत प्रवासाचा फायदा घेतला. त्याने कुटुंबासह दिल्ली ते डबलिन प्रवासासाठी बिझनेस क्लासची १५ तिकीटे बुक केली. ज्याचे पेमेंट त्याने क्रेडिट कार्डने केले. त्यातून रिवार्ड प्राप्त झाले. ज्यातून प्रवासातील बजेटचा मोठा हिस्सा होता. त्यात उड्डाण आणि हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा होती. 

गॅजेट खरेदी, ई कॉमर्स साईटवर शॉपिंग, मूव्ही पाहणे आणि बाहेर जेवणे यासाठी कॅशबॅक आणि व्हाउचरसह अन्य सुविधांचा क्रेडिट कार्डधारक फायदा घेऊ शकतात. प्रवासातील खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो. जेणेकरून त्यातून रिवॉर्ड पाँईंट मिळतात. ओपी जिंदाल विश्वविद्यालयाचे अर्थ विषयाचे प्रा. अंसारी यांनी सांगितले की, मी माझे सर्व नियमित खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतो. भाडे, किराणा माल, खरेदी, जेवण करणे आणि प्रत्येक व्यवहारावर मला रिवॉर्ड पाँईट मिळतात. इतकेच काय मी छोट्या खर्चासाठीही रिक्षा, भाजी घेणे त्यालाही क्रेडिट कार्ड वापरतो असं त्यांनी म्हटलं. 

मुर्शिदाबाद येथील छोटे व्यावसायिक सुमंता मंडल हेदेखील क्रेडिट कार्डच्या माध्यमातून महिन्याला सरासरी २ लाख खर्च करतात. माझा वैयक्तिक खर्च मर्यादित आहे परंतु व्यापारासाठी मी बिझनेस क्रेडिट कार्डचा वापर करतो. कुठल्याही खर्चाचा बहुतांश लाभ घेणे कार्डधारकावर निर्भर आहे. २५ लाख रुपये व्हॅल्यूएशनसाठी १५ मोफत बिझनेस क्लास फ्लाइट तिकीटवर १० लाख एयर मील मिळाले. ८० लाख खर्च केल्यानंतर ते जमा झाले. मागील १ वर्षात मी माझ्या लग्नासाठी, घराच्या दुरुस्तीसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला. क्रेडिट कार्डवर माझा वार्षिक सरासरी खर्च ३०-४० लाख होतो असं त्यांनी सांगितले. 

एक गोष्ट स्पष्ट आहे की, क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर केल्यानंतर रिवॉर्ड पाँईट मिळतात. त्यासाठी तुम्हाला वेळच्यावेळी क्रेडिट कार्ड बिल भरावे लागते. त्याने तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहतो. त्यामुळे तुम्हाला कॅशबॅक व्हाऊचर, रिवॉर्ड पाँईट मिळतो जो पूर्णपणे मोफत असतो. त्याचा वापर करून तुम्ही मोफत प्रवासासाठी करू शकतो.