मुंबई : खाद्यतेलाची १ लिटरचे प्लास्टिचे पाकिट व प्लास्टिकची बाटली याद्वारे विक्री होते. बाटल्यांद्वारे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांनी सरकारसोबत चर्चा करुन काही अटींच्याआधारे बंदी उठवली आहे. पण प्लास्टिकच्या १ लिटरच्या पाकिटावरील बंदी कायम आहे. यामुळे खाद्यतेल उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यासाठी त्यांना देशभरातील अशी ४७ कोटी पाकिटे बदलवावी लागणार आहेत. तेल उत्पादकांना पुनर्वापर शक्य असलेली नवीन पाकिटे बाजारात आणावी लागत आहेत. खाद्यतेल व्यवसायात ६० टक्के पाकिटे १ लिटरची असतात. त्यामुळेच ही सर्व पाकिटे बदलण्याचा तेल कंपन्यांचा खर्च आता वाढला आहे. पण हा खर्च ग्राहकांवर थोपवला जाणार नाही. उलट याद्वारे नवीन उद्योग क्षेत्र देशात उभे होईल, असे अदानी विल्मर या कंपनीचे सीओओ आंगशू मलिक यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिकबंदीमुळे वाढली खाद्यतेल क्षेत्राची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 1:10 AM