बुलडाणा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या वित्तीय सहायता योजनेतून आजार अथवा दुर्घटनेत अपंगत्व येणाऱ्या किंवा उपचार सुरु असणाऱ्या मजुरांना आता शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या संबंधातील निर्णय २८ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन सर्वस्तरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांच्या माध्यामातून प्रयत्नशील आहे. या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी शासन संबंधित विभागासह विविध स्तरावरुन प्रयत्न करीत आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यासाठीही शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.
यापुढे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या गंभीर आजारांवर उपचार करण्याकरिता वैद्यकीय मदत म्हणून (टी.बी व कॅन्सर सारखे आजार) उपचाराकरिता १० हजार रुपये वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती करण्यात येणार आहे.
शिवाय कामावर अपघात होऊन अपंगत्व आल्यास व ते अपंगत्व ७५ टक्के किंवा अधिक असल्यास त्यास १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.
नोंदणीकृत कामगारांचे आजारात निधन झाल्यास त्यांच्या अंत्यविधीस तातडीने मदत म्हणून ५ हजार रुपये वारसास देण्यात येतील. नोंदणीकृत कामगांराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीस अथवा पतीस दरमहा १ हजार रुपया प्रमाणे मृत्यू दिनांकापासून पुढील पाच वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळअंतर्गत हे वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम मजुरांना उपचारासाठी मदत
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या वित्तीय सहायता योजनेतून आजार अथवा दुर्घटनेत अपंगत्व येणाऱ्या किंवा उपचार सुरु असणाऱ्या मजुरांना आता शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे
By admin | Published: October 30, 2015 09:36 PM2015-10-30T21:36:45+5:302015-10-30T21:36:45+5:30