Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्होडाफोन-आयडियाला हवीय सरकारची मदत

व्होडाफोन-आयडियाला हवीय सरकारची मदत

भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत वाईट तिमाही नुकसान सोसल्यानंतर व्होडाफोन-आयडियाने सरकारकडे मदतीची याचना केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:09 AM2019-11-16T04:09:51+5:302019-11-16T04:09:56+5:30

भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत वाईट तिमाही नुकसान सोसल्यानंतर व्होडाफोन-आयडियाने सरकारकडे मदतीची याचना केली आहे.

Helpful Vodafone-Idea Government Govt | व्होडाफोन-आयडियाला हवीय सरकारची मदत

व्होडाफोन-आयडियाला हवीय सरकारची मदत

नवी दिल्ली : भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत वाईट तिमाही नुकसान सोसल्यानंतर व्होडाफोन-आयडियाने सरकारकडे मदतीची याचना केली आहे. कंपनीला कोसळण्यापासून वाचविण्यासाठी मदत मिळणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मागील कराच्या थकबाकीपोटी भारत सरकारने कंपनीला ४ अब्ज डॉलरचा भरणा करण्यास सांगितलेले आहे. त्यातच सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीला तब्बल ५०९ अब्ज रुपयांचा (७.१ अब्ज डॉलर) अभूतपूर्व तोटा झाला आहे. २०१७ पासून कंपनीला नफाच झालेला नाही. व्होडाफोन-आयडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालू राहणे हे आता केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रिय चर्चाही करीत आहे. कंपनीवर १४ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.

Web Title: Helpful Vodafone-Idea Government Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.